शिरपुरात गारांचा पाऊस, तूर, कांदा, कपाशीचे नुकसान
शिरपुरात गारांचा पाऊस, तूर, कांदा, कपाशीचे नुकसान 
मुख्य बातम्या

शिरपुरात गारांचा पाऊस, तूर, कांदा, कपाशीचे नुकसान

टीम अॅग्रोवन

जळगाव : खानदेशात धुळे व जळगाव जिल्ह्यातील काही भागांत मंगळवारी (ता.२१) सायंकाळी जोरदार पाऊस झाला. त्यात शिरपूर तालुक्‍यातील शहादा (जि. नंदुरबार) रस्त्यावरील वरूळ भटाणे परिसरात, तर निंबूपेक्षा मोठ्या गारा काही वेळ पडल्या. या पावसामुळे तूर, कांदा, कपाशी या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.  धुळे शहर व लगतच्या कुसुंबे, नेर, कापडणे, न्याहळोद, जापी आदी भागांत सायंकाळी ५.४०च्या सुमारास पाऊस आला. पावसाळ्यात दिसला नाही एवढा जोर पावसाचा होता. या पावसामुळे कपाशी लोळली, तर कांदा पिकात पाणी साचून त्यात मर रोग पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. तसेच सूक्ष्मसिंचन किंवा बागायती तुरीचेही मोठे नुकसान झाल्याची माहिती आहे.  पावखेडा (ता. शिंदखेडा, जि. धुळे) येथे व लगतच्या भागात एक तास जोरदार पाऊस झाला. त्यात सुसाट वाराही होता. वृक्ष उन्मळून पडले असून, विजेचे खांबही वाकले. वीज बंद झाली. ती बुधवारी (ता.२२) सकाळीदेखील सुरळीत झालेली नव्हती.  धुळे जिल्ह्यातील वरूळ भटाणे (ता. शिरपूर) या शहादा (जि. नंदुरबार) रस्त्यावरील गावांमध्ये मंगळवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास गारांचा पाऊस झाला. निंबूपेक्षा मोठा गारांचा आकार होता. दोन ते तीन मिनिटे गारा पडल्या. त्यात गहू, कांदा, कपाशी व केळी या पिकांचे या भागात नुकसान झाल्याची माहिती आहे. 

जळगाव जिल्ह्यातही फटका जळगाव जिल्ह्यातील मंगरूळ व शिरूर (ता.अमळनेर), मेहुणबारे (ता.चाळीसगाव) आदी भागांत मंगळवारी पाऊस झाला. पावसाने तूर पिकात फुलगळ वाढण्याची शक्‍यता आहे. पारोळा शहरासह लगतच्या भागातही पाऊस झाला. तसेच मेहुणबारे, पिलखोड (ता.चाळीसगाव) भागातही सायंकाळी किरकोळ पाऊस झाला. त्यात कांदा व कपाशीच्या पिकाच्या नुकसानीची भिती निर्माण झाली आहे. गणपूर (ता.चोपडा) येथेही सात ते आठ मिनिटे किरकोळ पाऊस झाला. त्यात उसतोडणी मजुरांची तारांबाळ उडाली. तसेच उघड्यावरील मका, ज्वारी यांची नासाडी होण्याची भिती निर्माण झाली.  प्रतिक्रिया... वरूळ भटाणे या शिरपुरातील गावांमध्ये मंगळवारी गारपीट झाली. त्यात गहू, हरभरा आदी पिकांच्या नुकसानीची भीती आहे. पाऊसही सुमारे पाऊण तास झाला.  - विजय पाटील, शेतकरी, शिंदखेडा, जि.धुळे

आमच्या भागात किरकोळ सरी कोसळल्या. मोठे नुकसान झालेले नाही, परंतु ढगाळ वातावरणाचा फटका तुरीला बसत आहे.  - किरण पवार, शेतकरी, घोडेगाव (ता.चाळीसगाव, जि.जळगाव)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer As Life Partner : आदर्शवत विवाहसोहळा

Poultry Disease : उन्हामुळे कुक्कुटपालनात मरतुकीचे प्रमाण वाढले

Sugar Commissionerate : साखर उपपदार्थ विभागाची सूत्रे देशमुख यांनी स्वीकारली

Loksabha Election 2024 : खडकवासला मतदार संघातील मतदान केंद्रांना साहित्याचे वितरण

Sugar Export Ban : साखर निर्यातबंदीमुळे ऊस उत्पादकांच्या स्वप्नांची माती

SCROLL FOR NEXT