विदर्भात आज गारपीटीचा इशारा 
विदर्भात आज गारपीटीचा इशारा  
मुख्य बातम्या

विदर्भात आज गारपीटीचा इशारा 

टीम अॅग्रोवन

पुणे : राज्याच्या विविध भागात पुर्वमोसमी पावसाने हजेरी लावली आहे. वादळी वारे, मेघगर्जना, विजा, गारपीटीसह पाऊस पडत आहे. आज (ता. २८) विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात वादळी वादळी पावसाची शक्यता आहे. तर विदर्भात तुरळक ठिकाणी गारपीट होण्याचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे. ढगाळ हवामान, पावसाळी वातावरणामुळे कमाल तापमानात काहीशी घट झाली आहे.  राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका चांगलाच वाढला होता. अकोला येथे राज्यातील उच्चांकी तापमानाची नोंद होत, हंगामात प्रथमच पारा ४० अंशांच्या वर गेला. अनेक ठिकाणी तापमान ३८ अंशाच्या पुढे गेले होते. मात्र पावसाळी वातावरण व ढगाळ हवामानामुळे कमाल तापमानात घट झाली आहे. अकोला येथे तापमान ३४.२ अंशांपर्यंत खाली आले आहे. शुक्रवारी (ता. २७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सोलापूर येथे ३८.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. निफाड, चंद्रपूर येथे प्रत्येकी ३७.५, तर मालेगाव येथे ३७ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. उर्वरीत राज्यात तापमान ३६ अंशांच्या खाली आहे. 

गुजरातपासून मध्य महाराष्ट्र, दक्षिण कर्नाटक दरम्यान हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रीय आहे. अरबी समुद्रातून होत असलेल्या बाष्पाच्या पुरवठ्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्रात ढगाळ हवामान होत आहे. आज (ता.२८) राज्यात वादळी पावसाचा अंदाज आहे. रविवारी (ता.२९) व सोमवारी (ता.३०) विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी गारपीट होण्याचा इशारा आहे. तर कोकणातही हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने विर्तविली आहे. 

शुक्रवारी (ता. २७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे किमाल व किमान (कंसात) तापमान, (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३४.६ (२१.९), जळगाव ३६.० (२२.२), कोल्हापूर ३५.६ (२३.५), महाबळेश्‍वर २८.४ (१८.४), मालेगाव ३७.० (२१.०), नाशिक ३४.६ (२१.३), निफाड ३७.५ (१९.४), सांगली ३५.४(२३.६), सातारा ३५.६ (२३.५), सोलापूर ३८.५ (२३.८), अलिबाग ३३.१, डहाणू ३४.० (२४.६), सांताक्रूझ ३५.९ (२५.१), रत्नागिरी ३३.२ (२५.६), औरंगाबाद ३२.३ (२१.९), परभणी ३६.१ (२१.१),अकोला ३४.२(२२.३), अमरावती ३१.० (२२.६), बुलडाणा ३३.० (२२.६), चंद्रपूर ३७.५ (२०.५), गोंदिया २९.२ (२०.८), नागपूर ३२.१ (२०.८), वर्धा ३२.० (२२.०). 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Policy : धोरण विसंगतीने होतेय शेतकऱ्यांची माती

Sugarcane Industries Problems : साखर उद्योगातील समस्येवर मुख्यमंत्री चर्चा करणार, शिष्टमंडळाला आश्वासन

Bogus Seed : सीमाभागात बोगस बियाणे विक्री रोखण्यासाठी तपासणी

Soil Conservation : ‘भूमी सुपोषण-संरक्षण’चा दीडशे गावांत संकल्प

Hapus Mango : सिंधुदुर्गातील बापर्डे येथे ६०५ ग्रॅमचा हापूस आंबा

SCROLL FOR NEXT