Guaranteed extension of purchase of tur-gram
Guaranteed extension of purchase of tur-gram 
मुख्य बातम्या

हमीभावाने तूर-हरभरा खरेदीस मुदतवाढ

टीम अॅग्रोवन

अमरावती ः लॉकडाउनमुळे हमीभावाने तूर व हरभरा विकण्यासाठी ऑनलाइन नोंदणीची प्रक्रिया अनेक शेतकऱ्यांना करता आली नाही. त्याची दखल घेत हरभऱ्यासाठी रविवार (ता. १४) तर तुरीसाठी सोमवार (ता. १५) पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. मात्र, जिल्ह्यात नोंदणीकृत अर्ध्यापेक्षा अधिक शेतकऱ्यांचा माल खरेदीच झाला नसल्याचे वास्तव समोर आले आहे.

जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या अहवालानुसार जिल्ह्यात डीएमओ (डिस्ट्रीक मार्केटींग ऑफीसर) व्दारे १ जानेवारीपासून तुरीची ऑनलाइन नोंदणी करण्यात आली. यामध्ये अचलपूर केंद्रावर ८७६ तर दुसऱ्या केंद्रावर ३२९९, चांदूर रेल्वे ३६३, दर्यापूर २८४०, धारणी २१८, तिवसा २२५७ व नांदगाव खंडेश्‍वर येथे ५८५७ अशी नोंदणी आहे. विदर्भ मार्केटिंग फेडरेशनव्दारे मोर्शी केंद्रावर ४३४९, वरुड ३७०१, धामणगावरेल्वे ५२२०, अमरावती ४५४३, चांदूरबाजार २३९९ व अंजनगावसुर्जी केंद्रावर १७३२ अशा एकूण ४०,५७० शेतकऱ्यांनी तूर विक्रीकरिता नोंदणी केली आहे.

हरभरा विकण्यासाठी अचलपूर केंद्रावर २३२६, चांदूररेल्वे १९११, दर्यापूर ३९९४, धारणी ६७३, नांदगाव खंडेश्‍वर १८७५ व तिवसा केंद्रावर १६४१ शेतकऱ्यांनी नेंदणी केली आहे. विदर्भ मार्केटिंग फेडरशेनच्या मोर्शी केंद्रावर २०५७, वरुड १२८१, धामणगाव २८९०, अमरावती २३६१ व अंजनगावसूर्जी केंद्रावर २७५४ अशा एकूण २६८३३ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disaster Relief Fund : रायगडमध्ये आपत्ती बचावासाठी हजार कोटी

Water Issue : शेतीसाठी ‘धनपूर’ धरणाच्या पाण्याची प्रतीक्षा

Orchard Planting : एक हजार हेक्टरवर सांगलीत फळबाग लागवड

Onion Market : कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पुन्हा धुळफेक; सरकारने दिलेली ९९,१५० टन निर्यातीला परवानगी जुनीच

Fertilizer Demand : चोपडा तालुक्याला २७ हजार टन खतांची गरज

SCROLL FOR NEXT