अमरावतीच्या भूजल पातळीत ०.५० मीटरची वाढ
अमरावतीच्या भूजल पातळीत ०.५० मीटरची वाढ 
मुख्य बातम्या

अमरावतीच्या भूजल पातळीत ०.५० मीटरची वाढ

टीम अॅग्रोवन

  अमरावती : जिल्ह्यातील दहा तालुक्‍यांत पावसाने गेल्या चार वर्षांत पहिल्यांदाच सरासरी ओलांडली. मात्र त्यानंतरही भूजल स्थिती फारशी चांगली नसल्याने मार्चअखेर जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची भीती वर्तविली जात आहे. 

जिल्ह्यात डिसेंबरपर्यंत ९३१.० मिली मीटरच्या तुलनेत ८७८.७ मिमी पावसाची नोंद झाली. पावसाची ही टक्‍केवारी ९४.३ इतकी होती. यात सर्वाधिक ८८४.७ मिमी म्हणजेच सरासरीच्या १३२.६ मिमी पाऊस दर्यापूर तालुक्‍यात तर सर्वात कमी मेळघाटात पडला. यामध्ये धारणी तालुक्‍यात ७५२.२ मिमी (६७.५ टक्‍के) चिखलदरा तालुक्‍यात ८४३.२ मिमी (५६.९ टक्‍के) इतकाच पाऊस झाला. गेल्यावर्षी १२ जूनपासून पावसाला सुरुवात झाली. या महिन्यात पावसाचे सरासरी १७ दिवस राहिले व १३१ टक्‍के पाऊस पडला. जुलै महिन्यात २३ दिवस पावसाची नोंद झाली.

सरासरीच्या ९८ टक्‍के पाऊस झाला. ऑगस्ट महिन्यात १८ दिवस दिवस पावसाचे राहिले व सरासरी ७७ टक्‍के बरसला. सप्टेंबर महिन्यात १६ दिवस पाऊस पडला व सरासरीच्या ९३.१० टक्‍के झाला. ऑक्‍टोंबर महिन्यात सात दिवसांत सरासरीच्या ९०.२ टक्‍के पावसाची नोंद झाली. त्यानंतर परतीचा पाऊसही चांगला झाला. ऑक्टोबरपासून भूजलाचे पुनर्भरण झाले. सद्या तीन तालुक्यांत १.२० मीटरपर्यंत वाढ व ११ तालुक्‍यांत ०.५० मीटरपर्यंत वाढ दिसून येत आहे.

दीडशे विहिरींचे निरीक्षण भूजल सर्व्हेक्षण विभागाद्वारे १४ तालुक्‍यांतील १५० निरीक्षण विहिरींची नोंद घेण्यात आली. त्यानुसार सरासरी ०.५० मीटरपर्यंत भूजलात वाढ झाल्याचे निरीक्षण आहे. सद्यःस्थितीत भातकुली १.०४ मी., चांदूररेल्वे १.३४ मी., चांदूरबाजार तालुक्‍यात १.०३ मीटर भूजल पातळी आहे. या शिवाय अमरावती ०.२०, नांदगाव खंडेश्‍वर व तिवसा ०.३४, मोर्शी ०.५६, वरुड ०.६१, अचलपूर ०.००, दर्यापूर ०.१९, अंजनगाव ०.१५, धारणी ०.२९, चिखलदरा ०.०५ व धामणगाव तालुक्‍यात ०.५० मीटरपर्यंत भूजलात वाढ झाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Issue : हस्तक्षेप थांबवा, कांदाप्रश्‍न कायमचा सुटेल

Shivaji University : शिवाजी विद्यापीठात आता बारावीनंतरही शिक्षणाची संधी

Indian Agriculture : खरिपात नको अफवांचे पीक

Animal Ear Tagging : ‘ईयर टॅगिंग’शिवाय जनावरांची वाहतूक बंद

Mango Market : अक्षय तृतीयेच्या बाजारात आंब्याची आवक सर्वसाधारण

SCROLL FOR NEXT