Greetings for the memory of Maharashtra sculptor Yashwantrao Chavan
Greetings for the memory of Maharashtra sculptor Yashwantrao Chavan 
मुख्य बातम्या

यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

टीम अॅग्रोवन

कऱ्हाड, जि. सातारा : देशाचे माजी उपपंतप्रधान आणि आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार (कै.) यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनानिमित्त राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार मोहनराव कदम यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी ज्येष्ठ नेते (कै.) चव्हाण यांच्या येथील समाधीवर पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.

यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनानिमित्त पालिकेने समाधी आकर्षक फुलांनी सजवली होती. सकाळपासूनच समाधीस अभिवादन करण्यासाठी मान्यवरांची वर्दळ सुरू होती. राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, माजी मंत्री कल्लाप्पा आवाडे, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील, नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, मलकापूर पालिकेचे उपाध्यक्ष मनोहर शिंदे, वसंतराव मानकुमरे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, एनएसयूआयचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर, निवृत्त आयुक्त प्रभाकर देशमुख, भाग्यश्री भाग्यवंत, सुहास बोराटे, देवराज पाटील, विजय वाटेगावकर, विनायक पावसकर, सुहास जगताप, नगरसेविका विद्या पावसकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी समाधीस्थळी अभिवादन केले. 

या वेळी दरवर्षी मुंबई येथून आणण्यात येणाऱ्या यशवंत समता ज्योतीचे स्वागत समाधिस्थळी जेष्‍ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी कार्यकर्त्यांनी यशवंतराव चव्हाण, अमर रहे च्या घोषणा दिल्या. दरम्यान दिवसभर विविध शाळा, महाविद्यालयासंह विविध क्षेत्रातील मान्यवरांची समाधिस्थळ अभिवादनासाठी वर्दळ सुरूच होती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

Road Work Update : पाणंद रस्त्यांची ८५० हून अधिक कामे ठप्प

Mathadi Worker Protest : माथाडी कामगारांचे सरणावर बसून आंदोलन

Agriculture Development : शेती विकासाला केंद्र सरकारने कायम प्राधान्य दिले

Crop Insurance : गतवर्षीच्या खरिपातील ३० कोटी पीकविमा मंजूर

SCROLL FOR NEXT