grapes cutting  
मुख्य बातम्या

अर्ली द्राक्ष हंगामाप्रारंभीच उत्पादक द्विधा मनःस्थितीत 

पूर्वहंगामी द्राक्ष पिकाबाबत कामांना गती आलेली नाही. सध्या तुरळक शेतकरी या हंगामाच्या नियोजनात लागले आहेत. बहुतांशी शेतकरी द्विधा मनःस्थितीत असून ऐन हंगामाच्या सुरुवातीला नियोजनाबाबत संभ्रम असल्याची स्थिती आहे.

टीम अॅग्रोवन

नाशिक : पूर्वहंगामी (अर्ली) द्राक्ष उत्पादनात जिल्ह्यातील कसमादे भाग आघाडीवर आहे. मागणी व मिळणारा दर यामुळे जूनपासूनच पूर्वहंगामी द्राक्ष पिकाच्या नियोजनाची लगबग सुरू होते. मात्र मागील वर्षी अतिवृष्टीमुळे झालेले कोट्यवधी रुपयांचे नुकसान तर आता ‘कोरोना’मुळे असलेल्या अडचणी यांचा धसका द्राक्ष उत्पादकांनी घेतला असून, पूर्वहंगामी द्राक्ष पिकाबाबत कामांना गती आलेली नाही. सध्या तुरळक शेतकरी या हंगामाच्या नियोजनात लागले आहेत. बहुतांशी शेतकरी द्विधा मनःस्थितीत असून ऐन हंगामाच्या सुरुवातीला नियोजनाबाबत संभ्रम असल्याची स्थिती आहे.  जोखीम घेऊन अर्ली हंगामात द्राक्षे तयार करून अधिक दर मिळविणे, हे सूत्र येथील येथील शेतकऱ्यांनी जोपासले आहे. मात्र मागील वर्षी अतिवृष्टीमुळे या भागातील ९५ टक्के बागा बाधित झाल्या. त्यामुळे १०० कोटींचा उत्पादन खर्च वाया गेला. या संकटातूनही शेतकरी सावरला, पुढे खरड छाटण्या केल्या;मात्र पुन्हा ‘कोरोना’ची परिस्थिती उद्भवल्याने कामकाज पुढे गेल्याचे प्रयोगशील द्राक्ष उत्पादक खंडेराव शेवाळे यांनी सांगितले. अर्ली द्राक्षांना रशिया,बांग्लादेश,श्रीलंका, दुबई येथून मागणी असते. मात्र चालू वर्षी एप्रिलमध्ये नियमित हंगामात निर्यातक्षम द्राक्षे उत्पादन खर्चाच्या निम्म्या दराने विक्री करावी लागली. त्यामुळे या हंगामाच्या तोंडी ही धास्ती शेतकऱ्यांमध्ये आहे. जर अशाच छाटण्या उशिरा होत गेल्या तर डिसेंबर, जानेवारी महिन्यात आवक वाढून दर पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र दिल्ली,कलकत्ता येथील काही व्यापाऱ्यांनी मालाची आगाऊ चौकशी केल्याने एक आशाही पल्लवित झाली आहे.   अर्ली द्राक्ष उत्पादनातून मोठे परकीय चलन मिळते. मात्र साठवणुक, शीतकरण आदी यंत्रणा नसल्याने अडचणी कायम आहेत. याबाबत सरकारकडे मागण्या करूनही दुर्लक्ष असल्याचे दिसून येते.

द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांपुढील प्रश्न

  • हंगामात मजुरटंचाई असल्याने पुढे मजूर मिळतील का
  • बाहेर राज्यातील व्यापारी खरेदीसाठी यावर्षी येतील का
  • बाहेरील देशांमध्ये मागणीसह दर कसा असेल
  • निर्यात न झाल्यास देशांतर्गत हा माल कसा विकायचा 
  • प्रतिक्रिया मागील वर्षी बिनधास्तपणे हंगाम उभा केला. मात्र अतिवृष्टीमुळे दोन एकरांवरील बाग बाधित झाली. त्यामुळे मागील वर्षीच्या हंगामात उत्पादन खर्च व उत्पन्नाची बरोबरी झाली. आता खर्च करून जर असेच झाले तर अडचणी वाढतील. मात्र तरीही जोखीम हंगामाची तयारी सुरू असली तरी भीती आहे. - चैत्राम पवार, द्राक्ष उत्पादक,वायगाव,ता.सटाणा, जि.नाशिक या भागातील वाण पारंपरिक आहेत.त्यामुळे मागील वर्षी मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. क्रिमसन सारखे नवे वाण थोडेफार टिकले. मात्र अनेक ठिकाणी उत्पादन खर्चही वसूल झाला नाही.त्यात आता ‘कोरोना’चे संकट असल्याने खर्च करावा की नाही अशी भीती आहे. त्यामुळे हंगाम दोन आठवडे पुढे सरकला. त्यात अपेक्षित गती नाही. -कृषिभूषण खंडेराव शेवाळे,  द्राक्ष उत्पादक,भुयाने,ता.सटाणा

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Pomegranate Export : राज्यातून डाळिंब निर्यातीसाठी २१ हजार शेतकऱ्यांची नोंदणी

    MahaDBT Portal : ‘महाडीबीटी’वरील अर्जांची नऊ महिन्यांपासून सोडतच नाही

    Banana Rate : केळीची कमी दराने खरेदी सुरूच कारवाईसत्र राबविण्याची मागणी

    Onion Purchase Investigation : कांदा खरेदीची केंद्राकडून चौकशी सुरू

    Raisins Deal : पेमेंट द्या; अन्यथा सौद्यात सहभाग नाही

    SCROLL FOR NEXT