संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

गावशिवारात प्रचाराची धूम

Gopal Hage

अकोला ः ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारासाठी आता अवघे तीन दिवस उरले अाहेत. ग्रामीण भागात गावशिवारात सर्वत्र प्रचाराचीच धूम सुरू झाली आहे. या वेळी ग्रामीण भागातही सोशल मीडियाचा प्रचंड वापर होत असून गटातटाचे राजकारण शिगेला पोचले आहे.

येत्या सात ऑक्‍टोबरला अकोला, बुलडाणा, वाशीम या तीनही जिल्ह्यांत सुमारे आठशेपेक्षा अधिक ग्रामपंचायतींची निवडणूक होऊ घातली आहे. यासाठी निवडणूक प्रक्रिया राबविली जात आहे. पहिल्यांदा सरपंच हा थेट जनतेतून निवडला जात असल्याने त्याची कमालीची उत्सुकता लागली आहे. सरपंचपदाची प्रतिष्ठा प्रचंड प्रमाणात वाढली आहे.

कुठल्याही निवडणुकीपेक्षा ग्रामीण भागात ग्रामपंचायत निवडणुकीला अधिक महत्त्व राहते. यादरम्यान अंतर्गत गटतटाचे राजकारणही शिगेला पोचले आहे. सध्या या जिल्ह्यांमध्ये उडीद, सोयाबीन सोंगणीचा हंगाम जोरात सुरू झाला आहे. मजूर पहाटेच शेतांमध्ये पोचत असल्याने निडवणूक प्रचाराची रंगत दुपारनंतर बघायला मिळते आहे. रात्रीच्यादरम्यान तर याला अधिक वेग आलेला असतो.

या निवडणुकीत उमेदवारांना सोशल मीडियाची मोठी मदत झाली आहे. गावागावात व्हाॅटसअॅप ग्रुपवरून प्रचाराचे मेसेज, उमेदवाराबाबतची माहिती फिरवली जाते. शिवाय उणे-दुणीही काढली जात आहे. चौकाचौकांत डिजिटल फ्लेक्‍स झळकलेले आहेत. निवडणूक आयोगाने खर्चाची मर्यादा वाढवून दिल्याने त्याचाही प्रभाव दृश्‍यस्वरूपात बघायला मिळत आहे. राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला निवडणूक ग्रामपंचायतींची असली तरी मोठी गावे आपल्या ताब्यात असावीत, यासाठी जिल्हा परिषद, पंचायत समिती स्तरावरील नेते आपली प्रतिष्ठा पणाला लावताना दिसत आहेत

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soil Conservation : ‘भूमी सुपोषण-संरक्षण’चा दीडशे गावांत संकल्प

Hapus Mango : सिंधुदुर्गातील बापर्डे येथे ६०५ ग्रॅमचा हापूस आंबा

Mango Season : आंबा विक्रीतून एक कोटी ६३ लाखांची कमाई

Climate Change : बदलत्या हवामानामुळे ‘ग्रीन नेट’ला मरगळ

Tambul GI : तांबूलसाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT