For Gram Seed Production, apply on Mahadbt: Lokhande
For Gram Seed Production, apply on Mahadbt: Lokhande 
मुख्य बातम्या

ग्रामबीजोत्पादनासाठी करा ‘महाडीबीटी'’वर अर्ज : लोखंडे

टीम अॅग्रोवन

परभणी  ः ‘‘यंदा रब्बी हंगामात जिल्ह्यास ग्रामबीजोत्पादन कार्यक्रमांतर्गत हरभरा पिकासाठी ४ हजार १७५ क्विंटल आणि गहू पिकासाठी १ हजार १४५ क्विंटलचा लक्ष्यांक प्राप्त आहे. पुढील ३ वर्षांसाठी प्रतिवर्ष एक तृतीयांश गावांची निवड करण्यात येणार आहे. तालुकानिहाय लक्ष्यांक जिल्हास्तरावरून निर्धारित करण्यात आला आहे. त्यानुसार निवड केलेल्या गावातील शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर शनिवारपर्यंत (ता.२५) अर्ज सादर करावेत’’, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय लोखंडे यांनी केले.

‘‘राष्ट्रीय कृषी विस्तार व तंत्रज्ञान अभियानांतर्गत (एनएमएटी) बियाणे व लागवड साहित्य उपअभियान कार्यक्रमांतर्गत रब्बी हंगाम २०२१-२२ मध्ये फार्म सेव्हड सीड्‍स वृद्धिंगत करण्यात येईल. शेतकरीस्तरावर बियाणे दरात वाढ करण्याच्या उद्देशाने या उपअभियानांतर्गत हरभरा आणि गहू या पिकासाठी ग्रामबीजोत्पादन कार्यक्रम कृषी विभाग व महाबीजतर्फे राबविण्यात येईल. त्यासाठी प्रतिशेतकरी १ एकराच्या मर्यादेत लाभ मिळेल. हरभरा पिकासाठी १० वर्षांच्या आतील (फुले विक्रम, राजविजय-२०२ एकेजी-११०९, फुले विक्रांत) ‍बियाण्यांसाठी २५ रुपये प्रतिकिलो अनुदान देय आहे,’’ असे लोखंडे यांनी सांगितले. 

लोखंडे म्हणाले, ‘‘दहा वर्षांवरील (जॅकी ९२१८, दिग्विजय, विजय, विशाल, विराट) बियाण्यांसाठी १२ रुपये प्रतिकिलो अनुदान देय आहे. गहू पिकासाठी १० वर्षाच्या आतील (फुले समाधान, एनपीएडब्ल्यू -१४१५)‍ बियाण्यासाठी २० रुपये प्रतिकिलो अनुदान देय आहे. १० वर्षांवरील एमएसीएस ६२२२, एचआय १५४४, जीडब्ल्यू-४९६6, लोकवन)‍ ‍बियाण्यांसाठी १० रुपये प्रतिकिलो अनुदान देय आहे. या योजनेच्या लाभासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करणे अनिवार्य आहे. मोबाईलवर अनेक शेतकरी अर्ज करू शकतील.’’

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन वाढले; कापूस, सोयाबीन, मका, हळद तसेच टोमॅटोचे काय आहेत दर ?

Pre-Sowing Tillage : धूळवाफेवरील भातपिकाच्या पेरणीपूर्व मशागतीला वेग

Water Scarcity : जळगाव जिल्ह्यातील पूर्व भागात पाणी टंचाई कमी

Kharif Season : खरिपासाठी पैसा उभा करण्याचे शेतकऱ्यांसमोर आव्हान

Summer Heat : उन्हाचा चटका; पिकांनाही फटका

SCROLL FOR NEXT