झाडाच्या संगोपनानंतरच विद्यार्थ्यांना पदवी
झाडाच्या संगोपनानंतरच विद्यार्थ्यांना पदवी 
मुख्य बातम्या

झाडाच्या संगोपनानंतरच विद्यार्थ्यांना पदवी

टीम अॅग्रोवन

उस्मानाबाद : डॉ. वेदप्रकाश पाटील शैक्षणिक संकुलातील कृषी महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी एक झाड दत्तक घेऊन चार वर्षे संगोपन करण्याची शपथ घेतली. वृक्षारोपणात विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग असावा, त्यांना वृक्षसंवर्धनाचे महत्त्व कळावे, यासाठी या महाविद्यालयातर्फे ‘एक झाड, एक विद्यार्थी आणि चार वर्षे'' हा अनोखा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्यानंतर झाड लावून चार वर्षे त्याची जोपासना करूनच पदवी घ्यायची, असा नियम महाविद्यालयाने केला आहे. 

झाडाच्या संगोपनाची शपथच विद्यार्थ्यांना देण्यात आली. या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला असून, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातंर्गत असा उपक्रम राबविणारे हे पहिलेच महाविद्यालय आहे. येथे प्रवेश घेतल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याला एक झाड देऊन त्याची चार वर्षे जोपासना करण्याची जबाबदारी व दुष्काळ, निसर्गाचा असमतोल आणि अन्य बाबींवर मात कशी करावयाची, याची माहिती वेळोवेळी देण्यात येणार आहे. 

शासनानेही वृक्षलागवड मोहीम सुरू केली आहे. महाविद्यालय रोपांची खरेदी करून देते. ते झाड लावण्यासाठी खड्डे खोदून देते. पुढील चार वर्षे या झाडांची काळजी आणि जोपासना करण्याची शपथ विद्यार्थ्यांना देण्यात आली. या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. पी. दंडनाईक, प्रा. जी. एम. फरताडे, प्रा. पी. के. गुरव, प्रा. डॉ. एस. एस. बांगर, प्रा. डी. एम. घावटे आदींच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांनी शपथ घेतली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT