फुले आणि मधापासून वाइननिमिर्तीस परवानगी
फुले आणि मधापासून वाइननिमिर्तीस परवानगी 
मुख्य बातम्या

फुले आणि मधापासून वाइननिमिर्तीस परवानगी

दीपा कदम : सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई : फुले आणि मधापासून वाइन बनविण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. चिकू, आंबा, गुलाबापासून वाइन तयार करण्यासाठी राज्य सरकारने परवानगी दिली असून, फुलांच्या वाइनमध्येदेखील मधाचा वापर केला जाणार आहे.  फुले आणि मधापासून वाइन तयार करण्यासाठी महाराष्ट्र हे देशातले पहिले राज्य असणार आहे. फुले आणि फळांमध्ये मधाच्या वापरामुळे आंबवण्याची प्रक्रिया ही अधिक जलद गतीने होत असल्याने फुले आणि फळांच्या वाइनमध्येदेखील मध वापरता येणार आहे. शिवाय मधामध्ये नैसर्गिक साखर असल्याने या वाइनमध्ये साखरेचे प्रमाण इतर वाइनच्या तुलनेत कमी असणार आहे. द्राक्षांपासून वाइन बनविण्यामध्ये राज्याच हिस्सा देशात ९० टक्‍के आहे. राज्याने अलीकडेच बीअर आणि वाइन बनविणे नियम १९६६ मध्ये बदल केले आहेत. ज्यामध्ये स्पीरिटस किंवा अल्कोहोलशिवाय फळ, फुले आणि मधापासून वाइन तयार करण्यासाठी परवानगी दिली. पुणे, नाशिक आणि विदर्भातील काही भागात फुले आणि फळांपासून वाइन तयार केली जाते. पाणी आणि ईस्ट वापरून ही वाइन तयार केली जात होती; मात्र या वाइनना परवानगी नसल्याने अशाप्रकारच्या वाइनना मोठी बाजारपेठ उपलब्ध होऊ शकली नव्हती. आता मध वापरून ही वाइन तयार करता येणार आहे. मधापासून वाइन तयार करण्यात आल्यानंतर दोन महिन्यांनंतर किंवा त्यानंतर कधीही घेतली तर तिची चव अधिक वाढणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Karnataka Drought farmers : कर्नाटकातील शेतकऱ्यांना लवकरच दिलासा; दोन-तीन दिवसांत मिळणार दुष्काळाचे पैसे 

Monsoon 2024 : सलग अकरा महीने उष्णतेची| तीन नवीन ट्रॅक्टर बाजारात दाखल| राज्यात काय घडलं?

Jambhul Season : जांभळाचा हंगाम लांबल्याने जांभूळ पिकाला फटका

Crop Loan : पीक वाटपात विदर्भ आणि मराठवाड्याशी दुजाभाव का?

Land Survey : कोल्हापुरातील सहा तालुक्यांत जमिनींची ‘ई-मोजणी’ सुरू

SCROLL FOR NEXT