Government's priority to double farmers' income: Kadam
Government's priority to double farmers' income: Kadam 
मुख्य बातम्या

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यास शासनाचे प्राधान्य : कदम

टीम अॅग्रोवन

सोलापूर ः ‘‘कृषी योजनांचा अधिकाधिक प्रसार करून सर्व योजना शेतकऱ्यांपर्यंत पोचवा. खते, बियाणे यांच्या पुरवठ्यावर लक्ष ठेवा. शेतकऱ्यांचे उत्पन्न आणि उत्पादनवाढ महत्त्वाची आहे. सरकारनेही शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणाऱ्या योजनांना प्राधान्य दिले आहे’’, असे कृषी राज्यमंत्री डॅा. विश्वजित कदम यांनी सांगितले. 

डॉ. कदम यांनी नुकताच नियोजन भवन येथे विविध विभागांचा आढावा घेतला. या वेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे, उपविभागीय कृषी अधिकारी जयवंत कवडे, सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त कैलास आढे, जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल कारंडे आदी उपस्थित होते.

डॅा. कदम म्हणाले, ‘‘सोलापुरात महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत ९९ टक्के शेतकऱ्यांना लाभ झाला आहे. खरीप पीक कर्ज वाटप ९८ टक्केपर्यंत झाले आहे. हे कौतुकास्पद आहे. यापुढेही शेतकऱ्यांच्या योजना थेट त्यांच्यापर्यंत कशा पोचतील, याकडे लक्ष द्या. सरकार शेतीप्रश्नावर गंभीर आणि सकारात्मक आहे. कृषी विभागाच्या अधिकाधिक योजना त्यांच्यापर्यंत पोचल्याच पाहिजेत.’’  

ज्वारी बियाण्याचे वाटप

भरड धान्य योजनेअंतर्गत उच्च उत्पादन क्षमतेच्या ज्वारीच्या फुले- रेवती या जातीच्या बियाणांचे वाटप कृषी राज्यमंत्री डॉ. कदम यांच्या हस्ते विठ्ठल गरड, रामचंद्र गरड, ओंकार वाघमोडे, रखमाजी गायकवाड, मारुती गायकवाड, नारायण पोतदार (सर्व रा. पाथरी, ता. उत्तर सोलापूर) आणि रेखा हजारे, कुसुम साठे, चंदना आवताडे, वालिका डफळे, जयश्री चटके (रा. पाकणी, ता. उत्तर सोलापूर) या शेतकऱ्यांना करण्यात आले. कृषी यांत्रिकीकरण योजनेतून प्रातिनिधिक स्वरूपात शेतकरी शिवानंद चनबसप्पा बिरादार या शेतकऱ्याला ट्रॅक्टर वाटप करण्यात आला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Storage : मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठा ७ ते ८ टक्क्यांवर

Green Hydrogen Project : हिमाचल प्रदेशच्या झाकरीत देशातील पहिला हरित हायड्रोजन प्रकल्प

Sustainable food : कार्बन फूटप्रिंट की शाश्‍वत अन्न?

Mumbai APMC Scam : संजय पानसरे यांना न्यायालयीन कोठडी

Elephant Issue in Germany : हत्तींवरून दोन देशांमध्ये रणकंदन

SCROLL FOR NEXT