सरकारचा अभिव्यक्ती स्वातंत्र्य दाबण्याचा प्रयत्न
सरकारचा अभिव्यक्ती स्वातंत्र्य दाबण्याचा प्रयत्न 
मुख्य बातम्या

शेतकरी आंदोलकांचा आवाज दाबण्याचा सरकारचा डाव

टीम अॅग्रोवन

नाशिक : २०१७ साली समृद्धी महामार्गाच्या आंदोलनाप्रकरणी  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी, युवक प्रदेशाध्यक्ष हंसराज वडघुले, भारतीय कम्युनिस्‍ट पक्षाचे राजू देसले, शिवड्याचे शेतकरी नेते सोमनाथ वाघ, रवींद्र पगार, अनिल काकड यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. निवडणुकीच्या तोंडावर शेतकरी आंदोलकांचा आवाज दाबण्याचा सरकारचा डाव आहे. हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा दाबण्याचा प्रकार आहे, असा आरोप शेतकरी नेत्यांनी पत्रकार परिषदेत केला.

या बाबतची माहिती गेली २ वर्षे शेतकरी आंदोलक व प्रसारमाध्यमांना कळविण्यात आले नाही. मात्र, आता याबाबत २४ मार्चला क्रिमिनल प्रोसिजर कोड -४१ (१) (अ) प्रमाणे जाणीवपूर्वक शेतकरी नेत्यांवर गुन्हा का दाखल झाला, असा प्रश्‍न उपस्थित करण्यात आला.

वडघुले म्हणाले, की लोकशाही मार्गाने शिवडे गावात जाऊन शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेऊन संवाद साधला होता. त्या वेळी सर्वांनी बाधित शेतकऱ्यांना पाठिंबा दिला. मात्र, सध्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात असल्याने आकसापोटी ही कारवाई करण्यात आली. 

जिल्हा परिषद सदस्या अमृता पवार, काँग्रेसचे शहराध्यक्ष शरद आहेर, स्वाभिमानीचे शहरप्रमुख नितीन रोठे पाटील, भाकपाचे राज्य सचिव राजू देसले, ज्‍येष्ठ नेते व्ही. डी. धनवटे, प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख दत्तू बोडके, आपचे नेते प्रभाकर वायचाळ, मराठा महासंघाचे शहराध्यक्ष चंद्रकांत बनकर, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा माधुरी भदाणे, संजय फडोळ यांसह विविध संघटना, पक्षाचे पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Development : शेती विकासाला केंद्र सरकारने कायम प्राधान्य दिले

Crop Insurance : गतवर्षीच्या खरिपातील ३० कोटी पीकविमा मंजूर

Jaljeevan Mission : रायगडमध्ये जलजीवनची निम्‍मी कामे अपूर्ण

Mango Market : उरणमध्ये आंब्यांची आवक वाढली

Water Scarcity : पाणीपुरवठा संस्थांचे शेतकरी पाणी टंचाईच्या कात्रीत

SCROLL FOR NEXT