नाशिकला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करणार : भुजबळ
नाशिकला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करणार : भुजबळ 
मुख्य बातम्या

नाशिकला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करणार : भुजबळ

टीम अॅग्रोवन

नाशिक : येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात येणार आहे. हे महाविद्यालय महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या आवारात सुरू करण्यात येणार असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली. नाशिक येथे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय स्थापन करण्याबाबतची बैठक मंत्रालयात झाली. त्या वेळी श्री. भुजबळ बोलत होते. बैठकीला वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव डॉ. संजय मुखर्जी, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर तसेच वैद्यकीय शिक्षण व आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.  या वेळी श्री. भुजबळ म्हणाले, प्रत्येक जिल्ह्यात एक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याच्या धोरणानुसार नाशिक येथेही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यात येणार आहे. हे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या आवारात सुरू करण्यात येईल. त्याकरिता नाशिक येथील जिल्हा सामान्य रुग्णालय संलग्नित करणे आवश्यक असून वैद्यकीय शिक्षण विभाग व सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्यात ३ वर्षांसाठी रुग्णालय हस्तांतरण करार करण्यात येईल. या शासकीय महाविद्यालयात पदवी आणि पदव्युत्तर हे दोन्ही अभ्यासक्रम एकत्रितपणे सुरू करण्यात येतील. यामध्ये आयुर्वेद, होमिओपॅथी व फिजिओथेरेपी हे अभ्यासक्रम आरोग्य विद्यापीठामार्फत सुरू करण्यात येतील. शासकीय महाविद्यालयाचा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळापुढे मांडण्यात येणार असल्याचेही श्री. भुजबळ यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Rate : कांद्याचे बाजार शुल्क घटवले एक रुपयावरून ५० पैशांवर

Crop Damage : गारपीट, वादळी पाऊस होऊनही पीक नुकसान नसल्याचा अहवाल

Veterinary : पशुचिकित्सा पुनर्रचनेविरोधात पदविकाधारकांनी थोपटले दंड

Crop Damage : अवकाळी पावसामुळे एक हजार हेक्टरवर नासधूस

Onion Market : ‘एनसीसीएफ’द्वारे उद्यापासून सुरू होणार कांदा खरेदी

SCROLL FOR NEXT