tur and urad
tur and urad  
मुख्य बातम्या

कांद्यानंतर 'या' पिकावर साठा मर्यादा घालणार

कोजेन्सिस वृत्तसेवा

नवी दिल्ली: देशात यंदा कडधान्याचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाजारात सध्या डाळींचे दर कमालीचे वाढले आहेत. परिणामी वाढत्या दरावर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकार तूर आणि उडीद पिकांच्या साठवणुकीवर मर्यादा घालण्याची शक्यता आहे, अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या सूत्रांनी दिली. त्यातच खरिपात महत्त्वाच्या कडधान्य उत्पादक राज्यांमध्ये काढणीच्या वेळी अतिवृष्टी आणि पुरामुळे मूग, उडदाचे मोठे नुकसान झाले. तूर पिकालाही फटका बसला. त्यामुळे सध्या बाजारात आवक कमी झाल्याने डाळींचे दर वाढले आहेत. ‘‘वाढत्या दरांवर नियंत्रण आणण्यासाठी तूर आणि उडीद पिकावर साठा मर्यादा घालण्याच्या हालचाली सुरू आहेत. साठा मर्यादा घातल्यास बाजारात पुरवठा वाढून दर नियंत्रण करता येतील. त्यामुळे हा निर्णय लवकरच होण्याची शक्यता आहे,’’ अशी माहिती सूत्रांनी दिली. सरकारने पहिल्या अंदाजात देशात २०१९-२० च्या हंगामात तूर उत्पादन ३५ लाख टन होण्याची शक्यता व्यक्त केली होती. मागील वर्षी ३६ लाख टन तूर उत्पादन झाले होते. ‘‘तुरीचे नवीन पीक बाजारात येईपर्यंत साठा मर्यादा घालून पुरवठा वाढविण्याचा सरकारचा विचार आहे. एकदा नवीन पिकाची आवक सुरू झाल्यास दर आपोआप कमी होतील,’’ असेही सूत्रांनी सांगितले.  अतिवृष्टीमुळे फटका    कडधान्य उत्पादक मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये अतिवृष्टीने पिकांचे मोठे नुकसान केले. त्यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. विशेषतः मूग आणि उडीद काढणीच्या काळातच पाऊस आणि पूरस्थिती निर्माण झाल्याने पीक हातचे गेले. उडीद पिकाला याचा मोठा फटका बसल्याने उत्पादनात मोठी घट झाली. त्यामुळे बाजारात डाळीचे दर ४० टक्क्यांपर्यंत वाढले आहेत.   आयातीचाही उपाय बाजारातील डाळींचे दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने कडधान्य आयातीलाही परवानगी दिली आहे. विशेषतः मूग आणि उडदाची आयात केली जाणार आहे. मूग आणि उडदाचा प्रत्येकी दीड लाख टन आयातीचा कोटा देण्यात आला आहे. तर तूर आयातीसाठी चार लाख टन आयात कोटा दिलेला आहे. या कोट्यातील कडधान्य आयातीचा कालावधी ३१ ऑक्टोबरएवजी १५ नोव्हेंबर करण्यात आला होता. परंतु, त्यात आता पुन्हा वाढ करण्याची शक्यता आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Management : खोडवा उसाचे व्यवस्थापन

Agriculture Processing Industry : प्रक्रिया उद्योगात तयार झाली ओळख

Hanneborg Farm : नॉर्वेमधील ग्राहकांची ‘हॅनेबॉर्ग फार्म’ला पसंती

Weekly Weather : मॉन्सूनच्या आगमनाची पूर्वतयारी सुरू झाली

Cotton Seed : कपाशीच्या बियाण्यांसाठी तेलंगणाची वारी

SCROLL FOR NEXT