इथेनाॅल
इथेनाॅल  
मुख्य बातम्या

इथेनॉलमधील फरक ओळखण्यासाठी यंत्रणा

कोजेन्सिस वृत्तसेवा

नवी दिल्ली ः देशात तीन प्रकारच्या मोलॅसिसपासून इथेनॉलनिर्मिती करण्यास केंद्राने मंजुरी दिली आहे. कोणत्याही प्रकारच्या मोलॅसिसपासून तयार होणार अंतिम उत्पादन, इथेनॉलसारखचे असल्याने नेमके कोणत्या प्रकारच्या मोलॅसिसपासून निर्मिती केली हे ओळखण्यासाठी केंद्राने यंत्रणा आणि मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत. त्यामुळे इथेनॉल सी हेवी मोलॅसिसपासून तयार केले की बी हेवी मोलॅसिसपासून तयार केले, हे सहजपणे ओळखता येणार आहे.  केंद्र सरकारने मोलॅसिसच्या वापरानुसार इथेनॉलचे वेगवेगळे दर जाहीर केले आहेत. इथेनॉलनिर्मिती करताना कारखान्याने कोणत्या प्रकारच्या मोलॅसिसचा वापर केला आहे, त्यानुसार दर मिळाणार असल्याने यातून निर्माण होणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी केंद्राने यंत्रणा तयार केली आहे. उत्तर प्रदेश ऊस विभागाने म्हटले आहे, की केंद्राने मोलॅसिसच्या प्रकारानुसार निर्मिती होणाऱ्या इथेनॉलचे दर जाहीर केले आहे. परंतु अंतिम उत्पादन अर्थात इथेनॉलसारखेच असणार आहे. त्यामुळे दराबाबत गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे.  राज्य उत्पादन शुल्क विभागाला अधिकार कारखाने किंवा डिस्टिलरीमध्ये उत्पादित होणारे इथेनॉलला प्रमाणित करण्याचे अधिकार संबंधित राज्यातील राज्य उत्पादन शुल्क प्राधिकरणााला देण्यात आले आहेत. कारखान्यांनी इथेनॉलनिर्मितीसाठी वापरलेल्या सी हेवी आणि बी हेवी मोलॅसिसचे प्रमाण प्रमाणित करण्याचे अधिकार आहेत. तसेच कोणत्या प्रकारच्या मोलॅसिसपासून इथेनॉल तयार केले आहे, त्यानुसार प्रत्येक कंटेनरला थेट ओळखण्यासाठी युनिक सीरियल नंबर देण्याचे काम राज्य उत्पादन शुल्क प्राधिकरणाला करायचे आहे, असे केंद्राने मार्गदर्शक तत्त्वांमध्ये म्हटले आहे.  असे आहेत दर केंद्राने नुकतेच बी हेवी मोलॅसिसपासून तयार होणाऱ्या इथेनॉलच्या दरात वाढ केली आहे. सी हेवी मोलॅसिसापासून तयार होणाऱ्या इथेनॉलला ४३.४६ रुपये दर आहेत. बी हेवी मोलॅसिसपासून तयार होणाऱ्या इथेनॉलसाठी ५२.४३ रुपये आणि सर्वांत जास्त दर हा थेट रसापासून (१०० टक्के कॉन्सन्ट्रेटेड) तयार होणाऱ्या इथेनॉलला ५९.१३ रुपये जाहीर केला आहे. कारखाने सर्वसाधारणपणे सी हेवी मोलॅसिसपासून इथेनॉलनिर्मिती करतात. उसातील साखर काढून शिल्लक राहिलेल्या मळीपासून सी हेवी मोलॅसिस मिळते. कारखान्यांनी बी हेवी मोलॅसिसपासून जास्तीत जास्त इथेनॉलनिर्मिती करावी यासाठी सराकर प्रयत्नशील आहे. प्रतिटन मोलॅसिसपासून असे मिळते उत्पादन साखर उद्योगातील तज्ज्ञांच्या मते, एक टन सी हेवी मोलॅसिसपासून २५० लिटर इथेनॉलनिर्मिती होते. एक टन बी हेवी मोलॅसिसपासून साधारणपणे ३५० लिटर इथेनॉल उत्पादन होते. थेट उसाच्या रसापासून (१०० टक्के कॉन्सन्ट्रेटेड) ६०० लिटर इथेनॉलनिर्मिती होते.    सरकारने जाहीर केलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार... 

  • साखर कारखाने आणि डिस्टिलरीजना सी हेवी मोलॅसिस आणि बी हेवी मोलॅसिस वेगवगळ्या टाक्यांमध्ये टाकावे. 
  • सी हेवी मोलॅसिसच्या टाकीच्या रंग गडद तपकिरी आणि बी हेवी मोलॅसिसच्या टाकीटा रंग फिकट तपकिरी ठेवावा. 
  • पाइपलाइनला असणारा रंगही याप्रमाणेच असावा. तसेच 
  • दोन वेगळ्या टाक्यांमध्ये मोलॅसिस टाकण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पाइपलाइनला एकमेकांशी न जोडता दोन वेगळे पंप बसवावे. 
  • इथेनॉलनिर्मिती किंवा वहन करताना कोणत्याही प्रकरचे भूमिगत पाइप बसवू नयेत. 
  • समजा साखर कारखान्याच्या डिस्टिलरीमध्ये मोलॅसिस पाठवायचे असल्यास सी हेवी मोलॅसिस आणि बी हेवी मोलॅसिस साठवण्यासाठी वेगळ्या सुविधा असाव्यात आणि कोणत्याही टप्प्यावर दोन्ही मोलॅसिस मिसळणार नाहीत याची शाश्वती द्यावी.
  • टाक्यांमध्ये जाणाऱ्या मोलॅसिसचे प्रकारानुसार वजन निश्चित करण्यासाठी ‘कॅलिब्रेटेड मास फ्लो मीटर’ पुरविण्यात येणार आहेत.   
  • इथेनॉलनिर्मितीसाठी कोणत्या प्रकराचे किती मोलॅसिस वापरले हे मोजण्यासाठी वेगवेगळ्या टाक्यांमध्ये वेगवेगळी लिक्विडेशन सिस्टिम बसविण्यात येणार आहे. 
  • जोडून असलेल्या डिस्टिलरी आणि इथेनॉल युनिटमध्ये एका वेळी एकाच मोलॅसिसवर प्रक्रिया करावी
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Kolhapur Dam : कोल्हापूर जिल्ह्यात गतवर्षीपेक्षा अधिक पाणीसाठा, शेतीसाठी दोन आर्वतने मिळणार?

    Brazil Flood : ब्राझीलमध्ये पुरामुळे ५६ लोकांचा मृत्यू

    Shirur Lok Sabha : शेती, बेरोजगारी, वाहतूकप्रश्‍न ‘जैसे थे’

    Sugarcane FRP : ‘सोमेश्वर’चा शंभर रुपयांचा दुसरा हप्ता आज देणार

    Sugar Industry : साखर उद्योग प्राप्तिकरातून मुक्त केला ः पाटील

    SCROLL FOR NEXT