गोदावरी दूध संघ शेतकऱ्यांसाठी ठरला ‘मिल्क बाउल’
गोदावरी दूध संघ शेतकऱ्यांसाठी ठरला ‘मिल्क बाउल’ 
मुख्य बातम्या

जतच्या ४२ गावांसाठी कर्नाटकशी करार ः खासदार संजय पाटील

टीम अॅग्रोवन

जत, जि. सांगली ः तालुक्‍याच्या पूर्व भागातील ४२ गावांना पाणी देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. कर्नाटकाला जादा पाणी सोडण्याची भूमिका घेतली आहे. आठवड्याभरात कर्नाटकचे जलसंपदामंत्री डी. शिवकुमार यांच्याशी बैठक होणार आहे. लवकरच संयुक्त करार करण्यात येईल, अशी माहिती कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष तथा खासदार संजय पाटील यांनी दिली. डफळापूर (ता. जत) येथील तलावात म्हैसाळ योजनेतून आलेल्या पाण्याचे पूजन खासदार पाटील, आमदार विलासराव जगताप यांच्या हस्ते झाले. 

श्री. पाटील म्हणाले, ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या आश्वासक धोरणामुळे दुष्काळी भागाला वरदान ठरणाऱ्या सिंचन योजना पूर्णत्वाला येत आहेत. दुष्काळी भागाच्या टोकाला पाणी दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. पश्‍चिम महाराष्ट्रातील योजना अनुशेषामुळे रखडल्या होत्या. मी, आमदार जगताप यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन सुधारित प्रशासकीय मान्यता घेतली. त्याला निधी उपलब्ध नव्हता. पंतप्रधान व गडकरी यांची भेट घेऊन निधीची मागणी केली. श्री. मोदींनी योजनेचा पंतप्रधान सिंचन योजनेत समाविष्ट करून दोन हजार कोटींचा निधी दिला.’’

श्री. पाटील म्हणाले, ‘‘जत पूर्व भागातील ४२ गावांना पाणी देण्यासाठी प्रयत्न आहे. कर्नाटक, महाराष्ट्राने संयुक्त करार केल्यास हा प्रश्न सुटू शकतो. आठवड्यात कर्नाटक सरकारसोबत बैठक होईल. कर्नाटकला जादा पाणी सोडण्याची भूमिका घेतली. करार लवकरच होईल.’’ 

श्री. जगताप म्हणाले, ‘‘अनेक वर्षे येथील जनतेला प्रतीक्षा लागली. निवडून आल्यानंतर प्रथम प्राधान्य दिले. दोन महिन्याला आढावा घेतला. योजनेचे काम गतीने झाले. दोन महिन्यांत पूर्ण होईल. अंकले व खलाटी पंप हाउसची चाचणी दोन दिवसांत होणार आहे. बिळूर, देवनाळ परिसरातील पाण्याचा प्रश्न मिटेल. डफळापूर परिसरातील शेतकऱ्यांनी समजूतदारपणा दाखवल्याने येथे लवकर पाणी आले.’’  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

SCROLL FOR NEXT