‘चांगभलं’च्या जयघोषाविना यंदा जोतिबाची यात्रा
‘चांगभलं’च्या जयघोषाविना यंदा जोतिबाची यात्रा 
मुख्य बातम्या

‘चांगभलं’च्या जयघोषाविना यंदा जोतिबाची यात्रा

निवास मोटे ः सकाळ वृत्तसेवा

जोतिबा डोंगर, जि. कोल्हापूर ः कोरोना आणि लॉकडाउनमुळे श्री जोतिबा देवाच्या चैत्र यात्रेच्या आज मुख्य दिवशी अख्खा डोंगर शांत होता. पालखी सोहळा भाविकांविना आणि ‘चांगभलं’चा जयघोषाशिवायच टेम्पोतून निघाला. पहाटे पाच वाजता मुख्य मंदिरात पन्हाळ्याचे तहसीलदार रमेश शेंडगे यांच्या हस्ते शासकीय अभिषेक झाला. सकाळी आठ वाजता राजेशाही थाटातील आकर्षक महापूजा दहा गावकर व पुजाऱ्यांनी बांधली. सायंकाळी साडेपाचला होणाऱ्या चैत्र यात्रेतील भव्य पालखी सोहळ्याची परंपरा यंदा खंडीत झाली.

१२१ वर्षांपूर्वीही यात्रा स्थगित चैत्र यात्रेचा सोहळा १२१ वर्षांनंतर यंदा भाविकांविना झाला. यापूर्वी१८९९ मध्ये प्लेगच्या साथीमुळे डोंगरावर चैत्र यात्रा झाली नव्हती. मंदिर गेल्या २५ दिवसांपासून बंद आहे. बाहेरील भाविकांना प्रवेश नाही. कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाने चैत्र यात्रा रद्द केली. यात्रेनिमित्त निदान पंधरा लोकांच्या उपस्थितीत पालखी सोहळा निघणार, अशी आशा ग्रामस्थ, पुजारी वर्गास होती; पण पालखी टेम्पोतून यमाई मंदिराकडे नेण्याच्या निर्णयावर प्रशासन ठाम राहिल्याने सोहळा रद्द झाला. पालखीची पारंपरिक परंपरा आज खंडित झाली. त्यामुळे ग्रामस्थ, पुजारी, भाविकांमध्ये नाराजी आहे.

एक भाविक दर्शनासाठी आलाच जोतिबा डोंगरावर कालपासून सर्वत्र कडक सुरक्षा व्यवस्था असतानासुद्धा आज गायमुख तलावमार्गे ६० वर्षांचा भाविक दर्शनासाठी आला. पोलिसांच्या लक्षात ही बाब आली. त्यांनी त्यास सुनाल्यावर भाविकाने ‘मी दर्शन घेतले, माझा जीव गेला तरी चालेल,’ असे म्हणत पोलिसांना हात जोडले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soil Conservation : ‘भूमी सुपोषण-संरक्षण’चा दीडशे गावांत संकल्प

Hapus Mango : सिंधुदुर्गातील बापर्डे येथे ६०५ ग्रॅमचा हापूस आंबा

Mango Season : आंबा विक्रीतून एक कोटी ६३ लाखांची कमाई

Climate Change : बदलत्या हवामानामुळे ‘ग्रीन नेट’ला मरगळ

Tambul GI : तांबूलसाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT