भाताला हमीभावासह ५०० रुपये बोनस द्यावा : खासदार शेट्टी
भाताला हमीभावासह ५०० रुपये बोनस द्यावा : खासदार शेट्टी 
मुख्य बातम्या

भाताला हमीभावासह ५०० रुपये बोनस द्यावा : खासदार शेट्टी

Raj Chougule

कोल्हापूर : भात उत्पादकांना प्रतिक्विंटल १५५० रुपये हमीभावासह ५०० रुपये बोनस द्यावा, अशी मागणी खासदार राजू शेट्टी यांनी बांबवडे (ता. शाहूवाडी) येथे केली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रविवारी (ता. १) आयोजित तिसऱ्या भात परिषदेत ते बोलत होते.

खासदार शेट्टी म्हणाले, की बाजारपेठ ही भावनेवर चालत नसून, मागणी व पुरवठ्याच्या सिद्धांतावर चालत असते. सरकारने बाजारपेठेत हस्तक्षेप करून खरेदी केल्यास शेतकऱ्यांना चांगला भाव मिळेल. जगामध्ये भाताचे उत्पादन या वर्षी २० कोटी टनांनी कमी होणार अाहे. देशातील भाताचे उत्पादनातही घटले आहे. व्यापाऱ्यांच्या खरेदी केंद्रातून शेतकऱ्यांची लुबाडणूक होत असून, एमएसपीपेक्षा कमी दराने भात खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी.

रविकांत तुपकर म्हणाले, की भाजप सरकारसोबत आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर युती केली होती. मात्र भाजप सरकारने याबाबत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर निराशा केली आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या असून, सरकार शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यात अपयशी ठरले आहे. राज्यातील युवा वर्गाला एकत्रित करून चळवळीचे बळ वाढविणार आहे.

या वेळी प्रा. जालंदर पाटील, राजू गड्यान्नावर, भगवान काटे, सयाजी मोरे, विक्रम पाटील आदी पदाधिकाऱ्यांनी मनोगते व्यक्त केली. सावकर मादनाईक, महिला बालकल्याण सभापती शुभांगी शिंदे, ज्येष्ठ नेते जयकुमार कोले, सागर शंभूशेटे, वाहतूक संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष तानाजी साठे, वसंत पाटील आदी उपस्थित होते.

सोळावी ऊस परिषद २८ ला शेतकरी ते ग्राहक या प्रक्रियेमुळे ग्राहकांना कमी दराने तांदूळ व शेतकऱ्यांचा जादा दराने भात खरेदी करता येईल. स्वाभिमानीच्या पुढाकाराने आवश्यक ठिकाणी भात खरेदी केंद्रे सुरू करणार आहे. स्वाभिमानाची सोळावी ऊस परिषद २८ ऑक्टोबरला जयसिंगपूर येथे होणार असल्याची माहितीही खासदार शेट्टी यांनी या वेळी दिली.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Department : राज्याला मिळेना विस्तार संचालक

POCRA Subsidy : ‘पोकरा’चे अनुदान लाटण्यासाठी बोगस बिले सादर केल्याचा संशय

Tomato Cultivation : अकोले, संगमनेरमध्ये टोमॅटो लागवडीत घट

Vithhal Sugar Mill : विठ्ठल कारखान्यावरील जप्तीची कारवाई अखेर मागे

Drought Crisis : पाण्याशिवाय जगणं मुश्किल झालंय

SCROLL FOR NEXT