Give insurance cover to Panpimpri crop
Give insurance cover to Panpimpri crop 
मुख्य बातम्या

पानपिंपरी पिकाला विम्याचे कवच द्या

टीम अॅग्रोवन

अकोला ः जिल्ह्यात पानपिंपरी या वनौषधीवर्गीय पिकाचे उत्पादन घेतले जात असून शासनाने या पिकाला पीकविम्यात समाविष्ट करावे, अशी मागणी उत्पादकांनी शासनाकडे करण्यात आली आहे. यापुर्वीही ही मागणी झालेली आलेली असताना शासनाकडून अद्यापपर्यंत कुठलीही धोरणात्मक पावले उचलण्यात आलेली नाहीत.

जिल्ह्यात सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या तेल्हारा, अकोट तसेच शेजारच्या अमरावती जिल्ह्यातील अंजनगावसूर्जी, परतवाडा आदी तालुक्यांत पानपिंपरी या वनौषधीचे उत्पादन घेतले जाते. वर्षानुवर्षे ही शेती होत असताना आजवर कृषी खात्याने या पिकाचा पीकविम्यात समाविष्ट व्हावा यादृष्टीने काहीही केलेले नसल्याची खंत शेतकरी मांडत आहे. दरवर्षी या पिकावर बुरशीजन्य रोग, गारपीट व इतर नैसर्गिक आपत्ती येतात. यात हातातोंडाशी आलेले पीक नामशेष होते. वेलवर्गीय पिकाचे अतोनात नुकसान होत असते.

पानपिंपरीच्या उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणात लागवड व व्यवस्थापन खर्च शेतकऱ्यांना करावा लागतो. अशातच आपत्ती आली की शेतकऱ्यांना नुकसान झेलावे लागते. दरवर्षी अशा घटनांमध्ये वाढ होत आहे. या आघातांमधून शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या उद्देशाने पानपिंपरीचा समावेश पीकविम्यात करावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

पानपिंपरी पिकाला आजपर्यंत पीकविम्याचे संरक्षण नसल्याने नुकसान झाल्यास मदत मिळत नाही. शासनाने या महत्त्वाच्या पिकाचा पीकविम्यात समावेश करावा. यामुळे उत्पादकाला आधार मिळू शकेल. - गजानन आकोटकर, उत्पादक, पणज ता. अकोट जि. अकोला

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

SCROLL FOR NEXT