vinayakrao patil
vinayakrao patil  
मुख्य बातम्या

दूध पावडरला प्रतिकिलो ५० रुपये अनुदान द्या : विनायकराव पाटील

टीम अॅग्रोवन

इस्लामपूर, जि. सांगली ः कोरोना सारख्या साथीत प्रचंड अडचणीत असलेल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना गाईच्या दुधास प्रती लिटर २५ रुपये खरेदी दर राज्य शासनाने दिला आहे. याबद्दल राज्यातील सर्व दूध उत्पादक संघांच्याकडून महाविकास आघाडी शासनाचे आभार व्यक्त होत आहेत. आता सर्व दूध संघांना शासनाने दूध पावडर निर्यातीस परवानगी द्यावी तसेच निर्यात होणाऱ्या दूध पावडरला प्रति किलो ५० रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाचे माजी अध्यक्ष व येथील राजारामबापू दूध संघाचे अध्यक्ष विनायकराव पाटील यांनी केली. विनायकराव पाटील म्हणाले की, सध्या कोरोनाच्या महामारीमुळे दूध उत्पादक व संपूर्ण दुग्ध व्यवसाय अडचणीत सापडला आहे. या काळात महाराष्ट्र शासनाने दूध उत्पादकांना गाईच्या दुधास प्रतिलिटर २५ रुपये खरेदी दर देऊन मोठा हातभार लावला आहे. गेल्या कित्येक वर्षात सहकारी दूध संघांना प्रथमच या शासनाने या द्वारे मदतीचा हात दिला आहे. हे शासन सहकार चळवळ टिकवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे या निर्णयातून सिद्ध होत आहे. या बद्दल महाविकास आघाडी सरकारचे सर्व सहकारी दूध संघांच्या वतीने व महाराष्ट्र राज्य दूध उत्पादक कृती समितीच्या वतीने आभार व्यक्त करतो. या बरोबरच राज्य शासनाने दूध पावडर निर्यातीसाठी प्रति किलो ५० रुपये अनुदान द्यावे अशी मागणीही आम्ही सहकारी दूध संघाच्या वतीने शासनाकडे करीत  आहोत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Market : कोट्यापेक्षा जादा साखर विक्री कारखान्यांना पडली महागात

Weather Update : सूर्य तळपल्याने होरपळ वाढली

Animal Care : वाढत्या उष्णतेचा पशुधनास फटका

Public Well Policy : सार्वजनिक विहिरींच्या पुनरुज्जीवनावर धोरण काय?

Agriculture Irrigation : ‘म्हैसाळ’चे पाणी माडग्याळ शिवारात

SCROLL FOR NEXT