घरांवर आता मुलींच्या नावाची पाटी
घरांवर आता मुलींच्या नावाची पाटी 
मुख्य बातम्या

नागपूर : घरांवर आता मुलींच्या नावाची पाटी

टीम अॅग्रोवन

नागपूर ः मुलींचा जन्मदर वाढावा, मुलगा, मुलगी भेदाभेद नष्ट व्हावा व मुलींबाबतही समाजात सन्मानाची भावना निर्माण व्हावी याकरिता जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाने पुढाकार घेतला आहे. त्या अंतर्गत आता लावण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.   ग्रामीण भागातील घरावर मुलींच्या नावाची पाटी लावण्याच्या उपक्रमाची सुरुवात १ जानेवारी २०२० पासून करण्यात आली आहे. ग्रामीण तसेच शहरी भागात आजही पुरुषी व्यवस्थेचा अंगीकार करण्यात आल्याची स्थिती आहे. त्यामुळे घरावर देखील पुरुषांच्या नावाची पाटी लावून ओळख दिली जाते. मात्र, या परंपरेला फाटा देत मुली व महिलांना सन्मान देण्याचा प्रयत्न महिला व बालकल्याण विभागाने केला आहे. मुलींचा जन्मदर व शिक्षणाचा स्तर वाढविण्यासाठी बेटी बचाओ, बेटी पढाओ या घोषवाक्याअंतर्गत केंद्र सरकारकडून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.  केंद्र सरकारने २० ते २६ जानेवारी दरम्यान बेटी बचाओ, बेटी पढाओ सप्ताह साजरा केला. त्याचाच एक भाग म्हणून ग्रामीण भागात ज्या घरी १ जानेवारी २०२० नंतर मुलींचा जन्म झाला. त्यांच्या घरी बालविकास प्रकल्प अधिकारी, पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी जाऊन तिच्या नावाची पाटी लावण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. मुलींच्या पालकांना मार्गदर्शन करुण पाटी लावण्यामागची भूमिका पटवून दिली जाते. जन्मलेल्या मुलीच्या नावाने पाटी लावली जात असल्याने त्या कुटुंबीयांनीही आनंद व्यक्‍त केला आहे. त्यासोबतच या कुटुंबीयांच्या घराजवळ किंवा परिसरात तिच्या नावाने एक वृक्ष लावण्याची मोहीमही हाती घेण्यात आली आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disaster Relief Fund : रायगडमध्ये आपत्ती बचावासाठी हजार कोटी

Water Issue : शेतीसाठी ‘धनपूर’ धरणाच्या पाण्याची प्रतीक्षा

Orchard Planting : एक हजार हेक्टरवर सांगलीत फळबाग लागवड

Onion Market : कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पुन्हा धुळफेक; सरकारने दिलेली ९९,१५० टन निर्यातीला परवानगी जुनीच

Fertilizer Demand : चोपडा तालुक्याला २७ हजार टन खतांची गरज

SCROLL FOR NEXT