मध्य प्रदेशात लेक माझी लाडकी; मुलींना दत्तक घेण्याच्या प्रमाणात वाढ
मध्य प्रदेशात लेक माझी लाडकी; मुलींना दत्तक घेण्याच्या प्रमाणात वाढ 
मुख्य बातम्या

मध्य प्रदेशात लेक माझी लाडकी; मुलींना दत्तक घेण्याच्या प्रमाणात वाढ

वृत्तसेवा

भोपाळ : नवरात्रोत्सवात मध्य प्रदेशात मुलींना अच्छे दिन आले आहेत. या राज्यात नागरिकांची मानसिकता बदलत असून, मुलांपेक्षा मुली दत्तक घेण्यास दांपत्ये प्राधान्य देऊ लागल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. अनाथ आश्रम किंवा बालगृहांमधून मुलींना मागणी वाढल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. बालकांना दत्तक देण्याची जबाबदारी केंद्र सरकारच्या दत्तक ग्रहण संसाधन प्राधिकरणाद्वारे पार पाडली जाते. या संस्थेने देशभराची गेल्या तीन वर्षांतील आकडेवारी नुकतीच प्रसिद्ध केली असून, या काळात ९,८६० बालकांना दत्तक देण्यात आले. त्यात ५,७८७ मुली आणि ४,०७३ मुलगे आहेत. याच काळात मध्य प्रदेशात ५५० बालकांना दत्तक देण्यात आले. त्यात ३२० मुली आणि २३० मुलगे होते, असे ही आकडेवारी सांगते. टक्‍क्‍यांच्या भाषेत सांगावयाचे झाल्यास, मुलींची टक्केवारी ५९ तर मुलांची ४१ आहे. बालकांना दत्तक घेण्यात महाराष्ट्र राज्य देशात अव्वल असून, त्यातही मुली दत्तक घेण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. पाठोपाठ कर्नाटक, तिसऱ्या क्रमांकावर ओडिशा आणि मध्य प्रदेश चौथ्या क्रमांकावर असल्याचेही या आकडेवारीत नमूद करण्यात आले आहे. बालक दत्तक देण्यापूर्वी संबंधित कुटुंबाची बारीक चौकशी केली जाते. या कुटुंबाच्या आर्थिक स्थितीकडे जास्त लक्ष दिले जाते. बालकांना दत्तक घेणाऱ्यांत सुशिक्षित आणि इतर आर्थिक स्थितीतील दांपत्ये जास्त आहेत. देशभरात दत्तक गेलेली बालके भारत (२०१६-१९) 

  • एकूण ः ३३७४
  • मुली ः १९७७
  • मुले ः १३९७
  • मध्य प्रदेश (२०१८-१९)

  •  एकूण : २०३१
  •   मुली ः ११५
  •   मुले ः ८८
  • बालकांना दत्तक घेण्याचे प्रमाण काहीसे कमी आहे. पण, आता लोकांची मानसिकता बदलली असून, मुली दत्तक घेण्यास दांपत्ये प्राधान्य देऊ लागली आहेत ही समाधानाची बाब आहे. - अनुपम राजन, मुख्य सचिव,  महिला आणि बाल विकास विभाग, मध्य प्रदेश  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Interview with Dashrath Tambale, Director of Atma : सेंद्रिय किंवा नैसर्गिक शेतीची सक्ती नाहीच...

    Rural Story : जागरण

    Sugarcane Management : खोडवा उसाचे व्यवस्थापन

    Agriculture Processing Industry : प्रक्रिया उद्योगात तयार झाली ओळख

    Hanneborg Farm : नॉर्वेमधील ग्राहकांची ‘हॅनेबॉर्ग फार्म’ला पसंती

    SCROLL FOR NEXT