Osmanabad goat
Osmanabad goat  
मुख्य बातम्या

उस्मानाबादी शेळीला मिळणार ‘जीआय’

राजेंद्रकुमार जाधव

उस्मानाबाद : एकापेक्षा अधिक करडे (पिले) देणाऱ्या आणि मांसासाठी प्रसिद्ध असलेल्या उस्मानाबादी शेळीचा भौगोलिक निर्देशांक (जीआय) नोंदणीसाठीचा अर्ज नुकताच दाखल करण्यात आला आहे. उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने हा अर्ज दाखल करण्यात आला असून, तीन महिन्यांत ही प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे. उस्मानाबादी शेळी ही जात दुहेरी उपयोगाची म्हणून ओळखली जाते. ही शेळी काटक आहे तसेच कोणत्याही परिस्थितीमध्ये जुळवून घेणारी आहे. या शेळीची वाढ जलद गतीने होते. साधारणतः वर्षभरातच तिचे वजन ४० किलोच्या जवळपास होते. एकाचवेळी ही शेळी किमान दोन ते पाच पिलांना जन्म देते. त्यामुळे शेळीपालन करणाऱ्यांना फायदा होतो. या शेळीच्या मांसाला जगभर मागणी आहे. शेळी दूध उत्तम दर्जाचे असते तसेच बाजारपेठेत चामड्यालादेखील चांगली मागणी असते. जिरायती शेतकऱ्यांसाठी शेळीपालन हा चांगला पूरक व्यवसाय ठरतो.  उस्मानाबादी शेळीला जीआय मिळाल्यास शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होऊ शकतो. याशिवाय शेतकऱ्यांना जातिवंत उस्मानाबादी जातीचे संवर्धन, गुणवत्ता टिकून ठेवण्यास जीआय मानांकनामुळे नक्कीच मदत होणार आहे. या बाबींचा विचार करून उस्मानाबादी शेळीला भौगोलिक निर्देशांक (जीआय) मिळावा, यासाठी पशुसंवर्धन विभागाने हालचाली सुरू केल्या आहेत. तत्कालीन जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांच्या कार्यकाळात यासंदर्भात प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी याला चालना दिली. एखादे विशिष्ट गुणधर्म असलेले, विशिष्ट भागात येणारे किंवा तयार होणारे उत्पादन किंवा पदार्थ एखाद्या विशिष्ट भागाचे प्रतिनिधित्व करीत असेल, तर त्याला भौगोलिक निर्देशांक (जीआय) कायद्यातर्गत दिले जाते. हा निर्देशांक म्हणजे केंद्र सरकारने विशिष्ट भागातील उत्पादनाला किंवा पदार्थाला दिलेला क्वालिटी मार्क असतो. त्यामुळे उत्पादनाचे ब्रँडिंग होते, उत्पादनाला हमीभाव मिळण्याबरोबरच जगभरात बाजारपेठ उपलब्ध होते. जीआयने आपल्या मालाला कायदेशीर अधिकारही मिळतो. यासंदर्भात चार टप्प्यांत ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार असून, त्यापैकी तीन टप्प्यांची प्रक्रिया पूर्ण झाली असून, चौथ्या टप्प्याची प्रक्रिया सुरू आहे. येत्या मार्चअखेर ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय, चेन्नई येथील भौगोलिक निर्देशांक नोंदणी कार्यालयामध्ये तसा अर्जही दोन डिसेंबर रोजी सादर करण्यात आला आहे. पुणे येथील जीएसजीसी (आयपीआर) संस्थेच्या मदतीने ही प्रक्रिया केली जात आहे. प्रतिक्रिया उस्मानाबादी शेळी ही वैशिष्ट्यपूर्ण आहे. गरिबांची गाय म्हणून ही शेळी समजली जाते. या शेळीला जीआय मानांकन मिळावे, यासाठीचा अहवाल तयार करण्यात आला असून, यासंदर्भात दोन डिसेंबर रोजी संबंधित विभागाकडे अर्जही दाखल केला आहे. जीआय मानांकन मिळणे शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरेल. - गणेश हिंगमिरे, जीआय-स्वामित्व हक्कतज्ज्ञ

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन वाढले; कापूस, सोयाबीन, मका, हळद तसेच टोमॅटोचे काय आहेत दर ?

Pre-Sowing Tillage : धूळवाफेवरील भातपिकाच्या पेरणीपूर्व मशागतीला वेग

Water Scarcity : जळगाव जिल्ह्यातील पूर्व भागात पाणी टंचाई कमी

Kharif Season : खरिपासाठी पैसा उभा करण्याचे शेतकऱ्यांसमोर आव्हान

Summer Heat : उन्हाचा चटका; पिकांनाही फटका

SCROLL FOR NEXT