अकोल्यातून गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेचा प्रारंभ
अकोल्यातून गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेचा प्रारंभ 
मुख्य बातम्या

अकोल्यातून गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेचा प्रारंभ

टीम अॅग्रोवन

अकोला : गोवर आणि रुबेलापासून बालकांचे रक्षण करणाऱ्या लसिकरण मोहिमेचा मंगळवारी (ता.२७) जिल्ह्यात प्रारंभ करण्यात अाला. प्रशिक्षित आरोग्य कर्मचाऱ्यांनी बालकांना लस टोचली. पाच आठवडे चालणाऱ्या या मोहिमेत नऊ महिने ते १५ वर्षे वयोगटातील बालकांना ही लस दिली जाईल.

अकोला येथून या मोहिमेला सुरवात झाली. या वेळी महापौर विजय अग्रवाल, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास पगारे, आरोग्य उपसंचालक डॉ. आर. एस. फारुखी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आरती कुलवाल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एम. एम. राठोड, माता बालसंगोपन अधिकारी डॉ. मनीष शर्मा, अतिरिक्त आरोग्य अधिकारी डॉ. विजय जाधव, मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. फारुख शेख, लसीकरण क्षेत्रीय अधिकारी डॉ. ठोसर, जिल्हा विस्तार माध्यम अधिकारी प्रकाश गवळी, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका निता फर्नांडीस उपस्थिती होत्या.

गोवर व रुबेलाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी शासनाने महत्वाकांक्षी मोहीम शहरी व ग्रामीण भागात सुरू केली आहे. जिल्ह्यातील सुमारे चार लाख २७ हजार ८७२ बालकांना लस देण्याचे उद्दिष्ट आहे. प्रथम सत्रात शालेय स्तरावर लसीकरण होईल. पालकांनी जागरूकपणे बालकांचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT