Garden destroyed in Dapoli, Mandangad
Garden destroyed in Dapoli, Mandangad 
मुख्य बातम्या

दापोली, मंडणगडमध्ये बागांना फटका

टीम अॅग्रोवन

रत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळाचा सर्वाधिक तडाखा दापोली, मंडणगड तालुक्यांना बसला आहे. वेगवान वाऱ्यामुळे आंबा, नारळी, पोफळीच्या बागा उध्वस्त झाल्या. तर, घरांची छते उडून गेली. शंभरहून अधिक गावे बाधित झाली असून नुकसानीचा आकडा कोटींच्या घरात जाण्याची शक्यता आहे. 

गुरुवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांत जिल्ह्यात सरारसरी पाऊस ९३.४४ मिलीमीटर झाला. त्यात मंडणगड १३०, दापोली १२५, खेड ७६, गुहागर ७७, चिपळूण १०२, संगमेश्वर ७३, रत्नागिरी ४०, लांजा १३१, तर राजापुरात ८७ मिमीची नोंद आहे. निसर्ग वादळाचा प्रभाव सायंकाळपर्यंत होता. वादळाचे केंद्रबिंदू अलिबाग असल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वाधिक वादळाचा फटका मंडणगड, दापोली, गुहागर या तालुक्यांना बसला. 

एकीकडे मुसळधार पाऊस आणि दुसरीकडे घरावरची कौले, पत्रे कागदासारखी उडून जमीनिवर कोसळत होती. छतच राहिले नाही. त्यामुळे मिळेल तिथे आधार घेत कुटुंबांतील ही मंडळी उघड्या डोळ्यांनी झालेले नुकसान पाहत होती. पावसाचे पाणी घरातील मांडलेला संसार उध्वस्त करत होते. हे चित्र या तीन तालुक्यांत सर्वाधिक पाहायला मिळाले. विजेचे खांब कोसळल्यामुळे पुरवठा खंडित झाला. मोबाईल टॉवर पडले. 

जिल्हा प्रशासनाने तात्काळ पंचनामे करायला सुरुवात केली आहे. दापोली तालुक्यातील कजिवली येथील मनोहर चव्हाण यांच्या काजू, आंब्याच्या झाडांचे मोठे नुकसान झाले. हर्णे बंदराजवळील नाडे गावातील सुमारे ८० घरांचे या वादळात नुकसान झाले. पाजपंढरीतील दोन जण जखमी झाले. आगरवायगणी तील वीरेंद्र येलंगे यांच्या बैल, तर आंजर्लेतील राजेश बोरकर यांची गाय मृत झाली. आंजर्लेतील मंगेश महाडिक याच्या सुमारे ४८ कोंबड्या मृत पावल्या. आवाशी येथील ६ घरांचे नुकसान झाले.  ५० हून अधिक गावे बाधित 

जालगाव येथील नरेंद्र बर्वे या बागायतदारांचे मोठे नुकसान झाले. सुमारे ५०० पोफळी, २० आंबा कलमे, सहा फणस झाडांचे नुकसान झाले. त्यातील काही झाडे मुळासह उन्मळून पडली. तालुक्यातील सुमारे पन्नासहून अधिक गावे बाधित झाली. या वादळामुळे चिपळूण तालुक्यातील १४ ग्रामीण रस्ते झाडे पडल्यामुळे बंद होते. ते सुरळीत करण्याचे काम सुरु आहे. नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT