गजानन महाराज प्रकट दिन
गजानन महाराज प्रकट दिन  
मुख्य बातम्या

गजानन महाराज प्रकटदिनी भक्तांची मांदियाळी

टीम अॅग्रोवन

शेगाव, जि. बुलडाणा ः विदर्भाच्या पंढरीत संत गजानन महाराज यांचा १४१ वा प्रकट दिन सोहळा लाखो भाविकांच्या उपस्थितीत साजरा झाला. गजाननाच्या नामघोषाचा या भाविकांनी गजर केला. प्रकट दिन सोहळ्यामुळे संतनगरीत सर्वच मार्ग गर्दीने फुलून गेले होते. संत गजानन महाराज यांच्या १४१ व्या प्रकट दिनाचे औचित्य साधत गेल्या सात दिवसांपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात अाले होते. सातही दिवस कीर्तन, काकडा आरती, यज्ञ झाला. सोमवारी (ता. २५) प्रकटदिनी या यज्ञाचा समारोप झाला. श्रीरामबुवा ठाकूर (परभणी) यांचे सकाळी १० ते १२ वाजेपर्यंत ‘श्रीं’च्या प्रगट दिनानिमित्त कीर्तन आयोजित करण्यात अाले होते.  प्रकट दिनानिमित्त गेल्या दोन दिवसांपासून राज्यभरातून भजनी दिंड्यांचे शेगावात आगमन व्हायला सुरवात झाली होती. सर्व मार्गांवर टाळ-मृदंगांचा गजर, संत गजानन महाराजांचा जयघोष एकसारखा सुरू होता. यामुळे संतनगरी या भक्तिमय वातावरणात दुमदुमून गेली.  गजानन महाराजांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी मोठी रांग लागली होती. रात्रभर दर्शनसोहळा सुरू होता. पुन्हा पहाटेपासून गर्दीत वाढ झाली. दुपारी १२ वाजेनंतर शेगावमध्ये सर्वत्र भाविकांची अलोट गर्दी झाली. सोहळ्यासाठी अालेले वारकरी, भाविकांच्या सोयीसाठी संस्थानतर्फे विविध सोयी-सुविधा पुरविण्यात अाल्या. शिवाय विविध सामाजिक संघटना, तरुण मंडळांनी भाविकांसाठी महाप्रसाद, नाश्ता, चहा-पाण्याची व्यवस्था केली. दुपारी श्रींच्या रजत मुखवट्याची नगर प्रदक्षणा निघाली. शहरातील विविध मार्गांवरून हा पालखी सोहळा गेला. या पालखीमार्गात जागोजागी भाविकांनी रांगोळ्या काढल्या होत्या. अनेक ठिकाणी पालखी सोहळ्यावर फुलांची उधळण करण्यात अाली. हजारो वारकरी हातात भगव्या पताका घेऊन पालखीसोबत चालल होते. गजानन महाराजांचा जयघोष करीत वारकरी भजनांमध्ये दंग झाले होते. रात्री उशिरापर्यंत संतनगरीच्या वाटा भाविकांच्या गर्दीने अोसंडून वाहत होत्या.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kolhapur Dam : कोल्हापूर जिल्ह्यात गतवर्षीपेक्षा अधिक पाणीसाठा, शेतीसाठी दोन आर्वतने मिळणार?

Brazil Flood : ब्राझीलमध्ये पुरामुळे ५६ लोकांचा मृत्यू

Shirur Lok Sabha : शेती, बेरोजगारी, वाहतूकप्रश्‍न ‘जैसे थे’

Sugarcane FRP : ‘सोमेश्वर’चा शंभर रुपयांचा दुसरा हप्ता आज देणार

Sugar Industry : साखर उद्योग प्राप्तिकरातून मुक्त केला ः पाटील

SCROLL FOR NEXT