Funds to be purchased in Beed
Funds to be purchased in Beed 
मुख्य बातम्या

बीडमध्ये होणार कोष खरेदी

टीम अॅग्रोवन

बीड : सतत विस्तारणाऱ्या व संकटात शेतकऱ्यांना शाश्वत आधार देणाऱ्या रेशीम उद्योगांतर्गत मराठवाड्यातील बीड येथे रेशीम कोष खरेदी बाजारपेठ सुरू होणार आहे. बीड कृषी उत्पन्न बाजार समितीने रेशीम विभागाच्या समन्वयातून व रेशीम कोष उत्पादक शेतकऱ्यांच्या मागणीतून कोष खरेदीसाठी पुढाकार घेतला आहे. प्रायोगिक तत्त्वावर ही बाजारपेठ सुरू करण्याच्या मान्यतेची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

मराठवाड्यात रेशीम उद्योगाचे जाळे अधिक घट्ट बनत चालले आहे. दुष्काळ आणि अतिवृष्टी या दोन्ही संकटात रेशीम कोष उत्पादक शेतकऱ्यांना शाश्‍वत उत्पादन मिळाले आहे. त्यामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी रेशीम उद्योगाला आपलसं केलं आहे. मराठवाड्यातील रेशीम उद्योगात बीड जिल्ह्याची आघाडी आहे. जिल्ह्यात जवळपास ३५९३ शेतकरी असून ३७८६ एकरांवर तुती लागवड आहे. २०२०-२१ मध्ये जिल्ह्यात ६५० टन रेशीम कोषाचे उत्पादन झाले, तर चालू वर्षी जवळपास ७०० टन रेशीम कोष उत्पादन अपेक्षित आहे. जिल्ह्यात एका ऑटोमॅटिक रेलिंग युनिटची मागणी असून, २ मिनी रेलिंग युनिट सुरू आहेत. जाणकारांच्या मते जिल्ह्यात किमान ५ ॲटोमॅटिक रेलिंग युनिट चालू शकतील, अशी जिल्ह्याची कोष उत्पादन क्षमता आहे. माहितीनुसार संपूर्ण पश्‍चिम महाराष्ट्रात जेवढे कोष उत्पादन होते तेवढे एकट्या बीड जिल्ह्यात होते. तर उत्तम दर्जाचे कोष जिल्ह्यात उत्पादित होत असल्याने रामनगरमच्या कोष बाजारात मागणी असते. 

बाजार समितीमध्ये रेशीम कोष खरेदी सुरू करण्यासाठी आवश्‍यक सुविधा उपलब्ध करून दिली आहे. येत्या ६ नोव्हेंबरला खरेदी सुरू करणे नियोजित आहे. ऑनलाइन पद्धतीने ही सर्व खरेदी प्रक्रिया होणार असून त्यासाठी स्वतंत्र बॅंक खातेही उघडण्यात आले आहे. रामनगरम, जालना, अंबाजोगाई आदी ठिकाणाहून कोष खरेदीसाठी व्यापारी येतील, अशी व्यवस्था करतो आहोत. - अशोक वाघिरे, सचिव, कृउबास बीड

बीड कृषी उत्पन्न बाजार समितीचा रेशीम कोष खरेदी बाजारपेठेसाठीचा पुढाकार रेशीम कोष प्रक्रियेची संधी निर्माण करणारा ठरणार आहे. बीड जिल्ह्याची रेशीम कोष उत्पादनातील आघाडी ती संधी उपलब्ध करून देते आहे. त्या दिशेने कोष खरेदीच पहिलं पाऊल आहे. - दिलीप हाके, उपसंचालक रेशीम, प्रादेशिक कार्यालय औरंगाबाद

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kolhapur River Pollution : पंचगंगा जलपर्णीच्या विळख्यात, गढूळ पाण्याचा दुर्गंध, प्रदुषण नियंत्रण मंडळ करतय काय?

Village Development : शेती प्रयोगशीलता अन ग्रामविकास...

Panchayat Development Index : पंचायत विकास निर्देशांक

Vegetable Market : कडक उन्हाचा पालेभाज्यांवर परिणाम, मार्केटमध्ये आंबेच आंबे

Agriculture Import : आयातीत कसली आत्मनिर्भरता?

SCROLL FOR NEXT