मंत्री महादेव जानकर
मंत्री महादेव जानकर 
मुख्य बातम्या

पशुसंवर्धन विकासासाठी ७०० कोटींचा निधी मिळणार : मंत्री महादेव जानकर

टीम अॅग्रोवन

कोल्हापूर  : राज्यातील पशुसंवर्धन विकासाला बळ देण्यासाठी ७०० कोटी रुपयांची वाढीव निधी लवकरच मिळणार आहे. त्यामुळे राज्यातील दुग्धोत्पादनाबरोबरच पशुसंवर्धनाला बळ मिळेल, असे मत पशुसंवर्धन व दुग्धव्यवसायमंत्री महादेव जानकर यांनी व्यक्त केले. 

येथील मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्रात पशुसंवर्धन संस्थांना आयएसओ प्रमाणपत्रवाटप शनिवारी श्री. जानकर यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. या वेळी श्री. जानकर म्हणाले, की कोल्हापुरातील मध्यवर्ती आणि अंडी उबवणी केंद्राने अंडी उबवणी तसेच कुक्कुटपालन व्यवसायात आघाडी घेतली असून, या केंद्राचा राज्यात प्रथम क्रमांक आला आहे. यासाठी येथील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घेतलेले कष्टही मोलाचे आहेत. भविष्यात या जिल्ह्यात पशुसंवर्धनाचे काम अधिक सक्षमपणे व्हावे, यासाठी मनुष्यबळ वाढविण्याचे प्रयत्न विभागामार्फत सुरू आहेत. त्याचाच भाग म्हणून रिक्तपदे भरण्यासंदर्भात तसेच पदोन्नतीचा प्रश्नही लवकरच मार्गी लावला जाईल .

राज्यातील जनावरांवर आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे उपचार व्हावेत, तसेच उपचारपूरक सुविधा ग्रामीण दुर्गम भागातील जनावरांपर्यंत पोचाव्यात, पशुसंवर्धन विभागाचे उपक्रम, योजनांचा प्रत्येक पशुपालकाला लाभ मिळावा, यासाठी या विभागाला वाढीव निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यामुळे राज्यातील दूध व्यवसाय व पशुसंवर्धन अधिक सक्षम करण्यास मदत होईल, असे श्री. जानकर यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

SCROLL FOR NEXT