माघी पौर्णिमेला बुधवारी खग्रास चंद्रग्रहण
माघी पौर्णिमेला बुधवारी खग्रास चंद्रग्रहण  
मुख्य बातम्या

माघी पौर्णिमेला बुधवारी खग्रास चंद्रग्रहण

सकाळ वृत्तसेवा

पुणे  ः ‘‘माघी पौर्णिमेला खग्रास चंद्रग्रहण आहे. भारतासह आशिया, अमेरिका, युरोपच्या ईशान्येकडील प्रदेश, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड येथील खगोलप्रेमी नागरिकांना हे ग्रहण पाहता येईल. बुधवारी (ता. ३१) सायंकाळी पाच वाजून १८ मिनिटांनी ग्रहण सुरू होईल. मात्र सूर्यास्तानंतर काही मिनिटांनी ग्रहण लागलेले चंद्रबिंब झाकलेल्या अवस्थेत दिसायला लागेल. संपूर्ण भारतात एक तास १७ मिनिटे हे ग्रहण पाहायला मिळेल,’’अशी माहिती पंचांगकर्ते मोहन दाते यांनी दिली.  भारतात पूर्वांचलाकडील काही प्रदेश वगळता सर्वत्र खग्रास अवस्था पाहायला मिळेल. ग्रहण लागल्यावर सायंकाळी सहा वाजून २१ मिनिटांनी चंद्रबिंब झाकोळलेले दिसू लागेल. सायंकाळी सात वाजून ३८ मिनिटांनी खग्रास अवस्था संपेल तरीही ग्रहण सुरू राहील. रात्री आठ वाजून ४२ मिनिटांनी ग्रहण संपेल. बुधवारी सूर्योदयापासून वेधकाळ सुरू होत असून, ग्रहण संपेपर्यंत वेध पाळावेत. माघ महिन्यातील पौर्णिमेच्या कुलधर्म-कुलाचाराचे धार्मिक कार्यक्रम, पूजन वेधकाळातही करता येतील. त्यामुळे सूर्योदयापासून दुपारपर्यंत (माध्यान्यवेळ) पूजादी विधी करावेत. या दिवशी अनेक गावांमध्ये यात्रा, उत्सव, पालखी मिरवणूक आदी धार्मिक कार्यक्रमही असतात. प्रथेप्रमाणे सायंकाळी पाच वाजेपर्यंत हे कार्यक्रम करावेत, असेही पंचांगकर्ते मोहन दाते यांनी कळविले आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Vaccination : पावसाळ्यापूर्वी जनावरांचे लसीकरण करा

Summer Sowing : दुष्काळी छायेतही २४ हजार हेक्टरवर पेरा

Summer Sowing : यवतमाळच्या शेतकऱ्यांची उन्हाळी तिळाला पसंती

Onion Export Policy : अस्थिर कांदा धोरणांचे उमटणार राजकीय पडसाद

Onion Export : कांदा निर्यात खुली; मात्र अटी, शर्थींचा खोडा

SCROLL FOR NEXT