औरंगाबाद : पारूंडी येथील रामेश्वर दौंड यांच्या बागेतील मोसंबी फळाची गळण्यापूर्वीची अवस्था.
औरंगाबाद : पारूंडी येथील रामेश्वर दौंड यांच्या बागेतील मोसंबी फळाची गळण्यापूर्वीची अवस्था. 
मुख्य बातम्या

मोसंबीची फळगळ वाढली

टीम अॅग्रोवन

औरंगाबाद : मोसंबीच्या आंबे बहारावर फळगळीचे संकट घोंगावते आहे. ५ ते १० टक्‍क्‍यांपर्यंत असलेली ही फळगळ काही बागांमध्ये १५ टक्‍क्‍यांपर्यंत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.  मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यात मोसंबीचे क्षेत्र ४६ हजार ५२२ हेक्‍टरवर विस्तारले आहे. त्यामध्ये सर्वाधिक २२ हजार ५३२ हेक्‍टर जालना जिल्ह्यात. त्यापाठोपाठ २२ हजार ४२ हेक्‍टर औरंगाबाद जिल्ह्यात, तर १९४७ हेक्‍टर बीड जिल्ह्यातील क्षेत्राचा समावेश आहे. मोसंबीचा आंबे बहार घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या मोसंबीत तूर्त फळगळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव व अन्न घटकांच्या कमतरतेमुळे ही फळगळ होत असल्याची माहिती हिमायतबाग फळ संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. एम. बी. पाटील यांनी दिली.  टीप ः लिंबूवर्गीय पिकातील फळगळ उपाय संदर्भात ॲग्रोवनमध्ये १४ आॅगस्ट रोजी सविस्तर लेख प्रसिद्ध झाला आहे. शेतकऱ्यांनी त्यानुसार नियोजन करावे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soil Conservation : ‘भूमी सुपोषण-संरक्षण’चा दीडशे गावांत संकल्प

Hapus Mango : सिंधुदुर्गातील बापर्डे येथे ६०५ ग्रॅमचा हापूस आंबा

Mango Season : आंबा विक्रीतून एक कोटी ६३ लाखांची कमाई

Climate Change : बदलत्या हवामानामुळे ‘ग्रीन नेट’ला मरगळ

Tambul GI : तांबूलसाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT