fruit market
fruit market 
मुख्य बातम्या

मुंबईत उद्यापासून फळ बाजार सुरु होणार

टीम अॅग्रोवन

मुंबई: भाजीपाला, कांदा-बटाटा आणि अन्न-धान्य बाजारापाठोपाठ मुंबई बाजार समितीत येत्या सोमवारपासून (ता.२०) फळं बाजारही सुरु केला जाणार आहे. दररोज अडीशे वाहनांनाच बाजार आवारात प्रवेश दिला जाणार आहे. तसेच बाजारात खरेदीदारांची गर्दी टाळण्यासाठी खरेदीदारांना किमान पंधरा हजार रुपयांच्या शेतमाल खरेदीचे बंधन घालण्यात आले आहे.  मुंबई आणि परिसरात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी १५ तारखेपासून भाजीपााला आणि कांदा-बटाटा तर १६ तारखेपासून अन्न-धान्य बाजार सुरु करण्यात आले आहेत. तर येत्या सोमवारपासून फळं बाजारही सुरु केला जाणार आहे. सध्या बाजार समितीत गर्दी होऊ नये यासाठी प्रत्येक बाजार येणाऱ्या वाहनांच्या संख्येवर नियंत्रण घालण्यात आले आहे. त्याच धर्तीवर फळं बाजारातही दररोज अडीचशे वाहनांना प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रात्री नऊ ते सकाळी पाच वाजेपर्यंत या वाहनांना बाजारात प्रवेश दिला जाईल.  बाजारात खरेदीदारांची गर्दी टाळण्यासाठी खरेदीदारांना किमान पंधरा हजार रुपयांची खरेदीचे बंधन घालण्यात आले आहे. त्यापेक्षा कमी रक्कमेचा खरेदी केलेला शेतमाल जप्त केला जाणार आहे. व्यापाऱ्यांना सकाळी सात ते दुपारी तीनपर्यंतच व्यापार करता येणार आहे. कोरोना आणि लॉकडाऊनच्या सूचनांचे पालन करण्यासाठी गाळाधारकाने खरेदीदारांमध्ये तीन फूट सामाजिक अंतर राखणे आवश्यक आहे, अन्यथा गाळाधारकारचा परवाना निलंबित केला जाणार आहे. तसेच शेतमाल मागवण्यास प्रतिबंध घातला जाणार आहे. तसेच गाळाधारकांना गाळा अथवा परवाना भाड्याने देण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. तसे आढळून आल्यास गाळे ताब्यात घेऊन परवाना रद्द केला जाणार आहे.  परवानाधारक अडते-व्यापारी यांनी त्यांचे मदतनीस, कामगार यांची स्वतः गाळाधारकाने कोरोना चाचणी करुन घ्यायची आहे. व चाचणी अहवाल बाजार समितीत दहा दिवसात सादर करायचा आहे. आदी विविध नियमांद्वारे बाजार समितीत कोरोना आणि लॉकडाऊनच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन बाजार समितीने केले आहे. बाजार समिती प्रशासन, फळ व्यापारी तसेच इतर संबंधित घटक यांच्या संयुक्त बैठकीत ही नियमावली निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसारच व्यापाऱ्यांना व्यवसाय करावा लागणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

SCROLL FOR NEXT