rice
rice 
मुख्य बातम्या

अंत्योदय, ‘प्राधान्य कुटुंब’ लाभार्थ्यांना तीन महिन्यांसाठी मोफत तांदूळः भुजबळ 

टीम अॅग्रोवन

मुंबई: राज्यातील स्वस्त धान्य दुकानांमधून एप्रिल आणि मे सोबत जून महिन्याचे धान्य देण्याचा आपण १९ मार्चला निर्णय घेतला होता. केंद्रशासनाकडून ३० मार्च २०२० रोजी एप्रिल ते जून २०२० दरम्यान नियमित धान्यासोबतच प्रति महिना प्रति व्यक्ती ५ किलो अतिरिक्त तांदूळ मोफत देण्याची अधिकृत सूचना प्राप्त झाली आहे, अशी माहिती अन्न, नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी दिली.  मंत्री भुजबळ, तीन महिन्यांचा अन्नधान्य साठा आणि तीन महिन्यांचा मोफत तांदूळ एकत्रितपणे उपलब्ध करून दिल्यास शिधा वाटप दुकानांमध्ये साठवणूक करणे जिकिरीचे होईल ही बाब शिधा वाटप दुकानदार संघटनांकडून शासनाच्या निदर्शनास आणण्यात आली तसेच केंद्रसरकारने ३० मार्च रोजी मोफत तांदूळ देण्याच्या निर्णय घेतल्यामुळे दोन दिवसांत धान्याची वाहतूक करण्यासाठी मर्यादा असल्यामुळे त्या त्या महिन्यामध्ये, त्या महिन्याचे धान्य वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला.  राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील पात्र रेशन कार्ड धारकाने नियमित स्वस्त धान्य खरेदी केल्यानंतर, त्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला ५ किलो अतिरिक्त तांदूळ मोफत देण्याची केंद्र सरकारची सूचना आहे. त्यामुळे आता प्रत्येक पात्र रेशन कार्डधारकाला त्याने नियमित अन्न धान्याची खरेदी केल्यानंतर, प्रती व्यक्ती ५ किलो तांदूळ त्या त्या महिन्यात मोफत उपलब्ध करून देण्यात येईल. राज्यातील ७ कोटी लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.  राज्यभरातील ४०० व्हाटसअॅप ग्रुप च्या माध्यमातून सर्व रेशन धान्य दुकानदारांना याबाबत सविस्तर सूचना दिल्या आहेत.व सामान्य जनतेची गैरसोय होणार नाही याबाबत दक्षता घेण्यास सांगितले आहे. त्याचप्रमाणे राज्यातील २ लाखाहून अधिक शिधापत्रिका धारकांनी नियमित धान्य घेतले आहे. तसेच सर्व रेशन धान्य दुकानांमध्ये आवश्यक धान्य पुरवठा करण्यात येत असून नियमित धान्य खरेदीनंतर शिधापत्रिका धारकांना लवकरच मोफत तांदळाचे वाटप केले जाईल.  सध्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर काळाबाजार व अतिरिक्त भाव वाढीच्या अनेक ठिकाणाहून तक्रारी प्राप्त होत आहेत. जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी किंवा चढ्या दराने विक्री केल्यास सात वर्षापर्यंत कैद होवू शकते. याबाबत पुरवठा विभाग,वैध मापन शास्त्र विभाग व पोलीस यांना संयुक्त कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल्याचे मंत्री भुजबळ यांनी सांगितले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

Road Work Update : पाणंद रस्त्यांची ८५० हून अधिक कामे ठप्प

Mathadi Worker Protest : माथाडी कामगारांचे सरणावर बसून आंदोलन

Agriculture Development : शेती विकासाला केंद्र सरकारने कायम प्राधान्य दिले

Crop Insurance : गतवर्षीच्या खरिपातील ३० कोटी पीकविमा मंजूर

SCROLL FOR NEXT