food service providers to get food material in less rate : Minister Chagan Bhujbal 
मुख्य बातम्या

अन्नछत्र चालविणाऱ्या संस्थांना अल्पदरात अन्न धान्य : भुजबळ

अन्नधान्य वितरण व अन्नछत्र चालविणाऱ्या संस्थांना अल्पदरात अन्नधान्य मिळावे यासाठीखुली बाजार विक्री योजना (ओएमएसएस) लागू करण्यात येत असल्याची माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

टीम अॅग्रोवन

नाशिक : स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून राज्यात अनेक ठिकाणी अन्नधान्य वाटप आणि अन्नछत्र सुरू करण्यात आली आहे. या अन्नधान्य वितरण व अन्नछत्र चालविणाऱ्या संस्थांना अल्पदरात अन्नधान्य मिळावे यासाठी केंद्र सरकारची देशांतर्गत खुली बाजार विक्री योजना (ओएमएसएस) योजना लागू करण्यात येत असल्याची माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

मंत्री छगन भुजबळ व केंद्रीय अन्न नागरी पुरवठा विभागाचे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा दूरध्वनीद्वारे राज्यातील जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याबाबत चर्चा झाली. त्यावेळी स्वयंसेवी संस्थांसाठी केंद्र शासनाची देशांतर्गत खुली बाजार विक्री योजना राज्यात लागू करण्याबाबत चर्चा झाली. राज्यात लॉकडाऊनच्या काळात ज्या स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून अन्नधान्य वितरण व अन्नछत्रे चालविली जात आहे त्या संस्थांना मागणीनुसार अल्पदरात केंद्र शासनाच्या ओएमएसएस म्हणजेच (Open Market Sale scheme) अंतर्गत एफसीआयच्या माध्यमातून अन्न धान्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

या योजनेच्या माध्यमातून स्वयंसेवी संस्थांना २१ रुपये प्रतिकिलो गहू व २२ रुपये प्रतिकिलो तांदूळ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. गहू व तांदूळ या अन्नधान्याची मागणी एकावेळी कमीत कमी १ मेट्रिक टन ते जास्तीत जास्त १० टनच्या आसपास असावी. यासाठी स्वयंसेवी संस्थांनी जिल्हाधिकारी यांना मागणीचा अर्ज करावा.त्यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत भारतीय खाद्य निगमकडून गहू आणि तांदूळ अल्पदरात उपलब्ध करून देण्यात येईल असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Corona Virus Immunity: विषाणूंना रोखणारी नवी उपचार पद्धती विकसित

Zero Tillage Farming: शून्य मशागत तंत्रातून गवसला यशाचा मार्ग

Duplicate Voter Issue: मतचोरीचे वास्तव...

Developed India: दिशा विकसित भारताची!

Cooperative Department: लेखा परीक्षा मंडळाची पदे सहकार विभागाकडे वर्ग

SCROLL FOR NEXT