द्राक्षउत्पादकांची अडीच कोटींच्या फसवणूक
द्राक्षउत्पादकांची अडीच कोटींच्या फसवणूक 
मुख्य बातम्या

नाशिक : द्राक्षउत्पादकांची अडीच कोटींची फसवणूक

टीम अॅग्रोवन

नाशिक  : मागील वर्षाच्या द्राक्ष हंगामात ओझर येथील आदित्य अ‍ॅग्रो एक्स्पोर्ट या द्राक्ष निर्यातदार कंपनीने निफाड, दिंडोरी, इगतपुरी व चांदवड तालुक्यांतील शेतकऱ्‍यांचे २ कोटी ४२ लाख ४६ हजार रुपये किमतीच्या द्राक्ष मालाची खरेदी केली. द्राक्ष उत्पादकांना या व्यवहारापोटी धनादेश दिले. मात्र, ते वटले नाही. यावर अनकेदा कधी पैसे देण्याचे वायदे केले. पैशांची मागणी करूनही ते मिळाले नाहीत. त्यामुळे द्राक्ष उत्पादकांनी संबंधितांविरुद्ध तक्रार दाखल केली, असून त्यानुसार तीन जणांवर पिंपळगाव बसवंत पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  २०१८-१९ वर्षाच्या चालू द्राक्ष हंगामात ७० द्राक्ष उत्पादकांनी माल आदित्य अ‍ॅग्रो एक्स्पोर्ट या कंपनीला दिला होता. मात्र, एक वर्ष होत आले तरी पैसे मिळत नसल्याने द्राक्ष उत्पादक रमेश खैरे यांच्यासह अन्य द्राक्ष उत्पादकांनी फिर्याद दिली आहे.  जिल्ह्यातील चार तालुक्यातील जवळपास ७० द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी ओझर येथील आदित्य एक्स्पोर्टचे संतोष बबन गवळी (रा. शिवाजी नगर ओझर), नीलेश बाळासाहेब दवांगे (रा. खेडगाव), पंकज माधव मोहन (रा. ओझर) या व्यापाऱ्यांना द्राक्षमाल विकला. मात्र, या व्यापाऱ्यांनी चार तालुक्यातील ७० शेतकऱ्यांना खोटे धनादेश देत फसवणूक केली. तसेच रक्कम देण्यास टाळाटाळ करीत गेल्या कित्येक दिवसांपासून फरार झाले होते. त्यानुसार दिलेल्या धनादेश, पावत्या सादर करून पिंपळगाव बसवंत पोलिस स्टेशनमध्ये तिन्ही व्यापाऱ्यांवर फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. यावेळी द्राक्षउत्पादक रमेश खैरे, अनिल कोठुळे, विनोद पाटील, नंदू मते, आनंद गायकवाड, अनिल जाधव, रोहित जाधव, बाळासाहेब गायकवाड, राजाभाऊ परदेशी, रमेश कुयटे उपस्थित होते.  हमीपत्र देऊन व्यापारी झाला फरार व्यापारी नीलेश बाळासाहेब दवांगे व पंकज माधव मोहन आदींची माहिती शेतकऱ्यांना मिळाली. त्यावर दवांगे यांनी शेतकऱ्यांचे पूर्ण पैसे देणार असल्याचे हमीपत्र पिंपळगाव बसवंत पोलिस स्टेशनमध्ये शेतकऱ्यांसमोर दिले. मात्र, हमीपत्र देउनही पैसे न देता तो फरार झाला.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

River Pollution : नदी प्रदूषणमुक्त करणारा ‘महाड पॅटर्न’

Agriculture Electricity : कृषी पंपाच्या वीजपुरवठा अनियमित पिकांना फटका; शेतकरी अडचणीत

Milk Production : वाढत्या उष्णतेचा पशुधनावर थेट परिणाम, मुदतपूर्व प्रसूतीच्या घटनांत वाढ

Climate Change : जो स्वतःला बदलेल, तोच टिकेल

River Pollution : नदी प्रदूषणाबाबत गंभीर कधी होणार?

SCROLL FOR NEXT