भाजपच्या चार विद्यमान खासदारांचा पत्ता कट
भाजपच्या चार विद्यमान खासदारांचा पत्ता कट 
मुख्य बातम्या

भाजपच्या चार विद्यमान खासदारांचा पत्ता कट

टीम अॅग्रोवन

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने शुक्रवारी रात्री उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली असून यात ३६ उमेदवारांचा समावेश आहे. यात महाराष्ट्रातील सहा जागांचा समावेश असून जळगावमधून स्मिता वाघ, नांदेडमधून प्रताप चिखलीकर, दिंडोरीतून डॉ. भारती पवार, पुण्यातून गिरीश बापट, बारामतीतून कांचन राहुल कुल आणि सोलापूरमधून डॉ. जयसिद्धेश्वर स्वामी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने गुरुवारी पहिली यादी जाहीर केली होती. पहिल्या यादीत १८४ उमेदवारांचा समावेश होता. तर शुक्रवारी रात्री जाहीर ३६ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. दुसऱ्या यादीत राज्यातील चार विद्यमान खासदारांचा पत्ता कट करण्यात आला आहे. यात पुण्यातील विद्यमान खासदार अनिल शिरोळे, सोलापूरचे शरद बनसोडे, जळगावचे ए. टी. पाटील आणि दिंडोरीचे हरिश्चंद्र चव्हाण यांचा समावेश आहे. जळगावमध्ये एकनाथ खडसे यांच्याऐवजी भाजपा पक्षश्रेष्ठींनी गिरीश महाजन यांच्या गटातील आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसनेही आणखी ३५ उमेदवार जाहीर केले आहेत. यात महाराष्ट्रातील पाचजणांचा समावेश आहे. यामध्ये चंद्रपूर- विनायक बांगडे, जालना- विलास औताडे, औरंगाबाद- सुभाष झांबड, भिवंडी- सुरेश टावरे, लातूर- मच्‍छिंद्र कामत यांचा समावेश आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Market : केंद्राच्या अस्थिर धोरणामुळे स्पर्धक कांदा उत्पादक देश मालामाल

Rain Forecast : द. आशियात सरासरीपेक्षा अधिक पाऊसमान

Climate Change : कोकणातील रानमेवा हंगामदेखील लांबणीवर

Education Fund : रानमसलेच्या प्राथमिक शाळेसाठी ‘लक्ष्मी’कडून सव्वा कोटींचा निधी

Lake Conservation : जैवविविधतेच्या बळावर ‘त्या’ करतात तलावाचे संवर्धन

SCROLL FOR NEXT