राज्यात ४० हजार टन दूध पावडर पडून
राज्यात ४० हजार टन दूध पावडर पडून 
मुख्य बातम्या

राज्यात ४० हजार टन दूध पावडर पडून

टीम अॅग्रोवन

पुणे : राज्यात ४० हजार टन दूध पावडर (भुकटी) पडून आहे. यामुळे खासगी व सहकारी दूध प्रकल्पांमध्ये तयार झालेले पावडरचे साठे ‘ना नफा - ना तोटा’ तत्त्वावर खरेदी करावेत. पावडरचा बफर स्टॉक करण्याची वेळ आली आहे, असे मत इंडियन डेअरी असोसिएशनचे माजी अध्यक्ष अरुण नरके यांनी व्यक्त केली.  ‘कोरोना’च्या स्थितीमुळे दूध आणि दुग्धजन्य पदार्थांना मागणी नसल्याने डेअरी उद्योग आर्थिक संकटात सापडला आहे. यासाठी सहकारी संघांचे रोज दहा लाख लीटर दूध खरेदी करण्याची घोषणा सरकारने केली. प्रत्यक्षात १० लाख लिटरवर ही खरेदी गेलीच नाही; तसेच या खरेदीपोटी मिळालेल्या २०० कोटींच्या निधीतील एक रुपया देखील वाटप केला गेलेला नाही.  श्री. नरके म्हणाले, की दूध पावडरबाबत अशी स्थिती तीन वर्षांपूर्वी देखील आली होती. आत्ताचे चित्र मात्र जास्त भयावह आहे. केंद्र व राज्य सरकारने मतभेद विसरून राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना तारण्यासाठी दूध पावडरचे बफर स्टॉक तयार करण्याबाबत तातडीने नियोजन केले पाहिजे. अडवलेले पेमेंट तातडीने अदा केले पाहिजे. राज्यात सध्या ‘कोरोना’मुळे निर्माण झालेल्या अतिरिक्त दुधाच्या समस्येला हाताळण्यासाठी पावडर निर्मिती हाच पर्याय आहे. तथापि, त्यात नियोजन अजिबात नाही. कोल्हापूरच्या गोकुळ संघात १८०० टन पावडर पडून आहे. इतर संघांचे सरकारने खरेदी केलेले दूध देखील ‘गोकुळ’मध्ये येते. त्याची रोज ५० टन पावडर केली जाते. मात्र, अजून सरकारने कोणतेही शुल्क तसेच अनुदान अदा केलेले नाही, असे ‘गोकुळ’चे म्हणणे आहे. शिल्लक दूध पावडरचे चित्र

देशातील साठा  ७० हजार टन 
राज्यातील साठा  ४० हजार टन
पावडरचे दोन महिने आधीचे दर  ३३० रुपये प्रतिकिलो
पावडरचे सध्याचे दर  २७० ते २९० रुपये प्रतिकिलो
पावडरचा उत्पादन खर्च  २३० रुपये प्रतिकिलो

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT