Forest tourism in Narwat, There will be a bamboo training center
Forest tourism in Narwat, There will be a bamboo training center 
मुख्य बातम्या

नारवटमध्ये वन पर्यटन, बांबू प्रशिक्षण केंद्र होणार

टीम अॅग्रोवन

नांदेड : ‘‘भोकर तालुक्यातील नारवट येथे वनपर्यटन केंद्र व बांबू प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे. या बाबतचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून काम लवकर सुरू करण्यासाठी आराखडा तयार करा’’, अशा सूचना पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली.

नारवट येथे बांबू प्रशिक्षण केंद्र तसेच निसर्ग उद्यान उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पाची आढावा बैठक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (ता. १८) मुंबईत झाली. जिल्हाधिकारी डॉ. विपिन, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अविनाश धोंडगे, उपवन संरक्षक आर. ए. सातेलीकर आदी उपस्थित होते.

चव्हाण म्हणाले, ‘‘नारवट येथील ७०० एकर जागेपैकी १०० एकर जागेवर पर्यटकांसाठी सोयी सुविधा असलेले निसर्ग पर्यटन उद्यान,  बांबू प्रशिक्षण केंद्र उभारणार आहे. यात चांगल्या सुविधा असाव्यात, पर्यटकांना निसर्गाचा आनंद घेता यावा, यासाठी आराखडा तयार करण्यात येत आहे. या निसर्ग पर्यटन केंद्राला किती जण भेट देऊ शकतील, त्याची देखभाल दुरुस्तीसाठी उपाययोजना आदींबाबतही विचार करा. हे केंद्र संपूर्ण सौरऊर्जा प्रकल्पावर चालविण्यात यावा.  आणखी काही चांगल्या सुविधा निर्माण कराव्यात. नर्सरी, बांबू प्रशिक्षण केंद्रासाठी सुविधा केंद्रे, सध्या असलेल्या तलावाची दुरुस्ती व मजबुतीकरण करा.’’ 

‘‘या प्रकल्पासाठी राष्ट्रीय बांबू प्रकल्प, कौशल्य विकास विभाग व इको टुरिझम बोर्ड आदी विभागांचाही सहभाग घेऊन आराखडा तयार करावा. बांबू प्रशिक्षण केंद्रातील वस्तूंचे विक्री व प्रदर्शनासाठी विशेष नियोजन करावे’’, चव्हाण यांनी सांगितले. 

प्रस्तावित केंद्रात बांबू अभ्यागतांसाठी सुविधा केंद्राबरोबरच प्रशिक्षण घेणाऱ्यांसाठीही सामान्य सुविधा केंद्राच्या दोन इमारती बांधण्यात येतील. बांबूवरील प्रक्रिया प्रकल्प, डिझाईन सेंटर, बांबूपासून बनणाऱ्‍या हस्तकला साहित्यासाठी इमारत, नर्सरी, जैवविविधता उद्यान आदी सुविधा असतील.

त्याचबरोबर तलावाचे पुनरुज्जीवन, जॉगिंग ट्रॅक, प्रदर्शन कक्ष, कॅफेटेरिया, खुले सभागृह, विद्यार्थ्यांसाठी व ट्रेकर्ससाठी सुविधा आदींचाही समावेश पहिल्या टप्प्यात आहे. सुविधा केंद्रात बांबूचा बांधकाम क्षेत्रातील उपयोगासंबंधीचा प्रमाणपत्र वर्ग, बांबूपासून फर्निचर तयार करणे, हस्तकला वर्ग आदी प्रशिक्षण वर्ग सुरू होणार आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drip Irrigation : ठिबक सिंचनासाठी ‘जीएसआय’ प्रणालीचा वापर

Agriculture Success Story : हवामान बदलाला सुसंगत शेती वरकड बंधूंची...

Rice Research : ‘बी१’ जीवनसत्त्व अधिक असलेला भात विकसित

Waghad Project : ‘वाघाड’ने घडविला कायापालट

Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

SCROLL FOR NEXT