वनमंत्री संजय राठोड यांचा अखेर राजीनामा Forest Minister Sanjay Rathore Finally resigned
वनमंत्री संजय राठोड यांचा अखेर राजीनामा Forest Minister Sanjay Rathore Finally resigned 
मुख्य बातम्या

वनमंत्री संजय राठोड यांचा अखेर राजीनामा

टीम अॅग्रोवन

मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात शिवसेना नेते, वनमंत्री संजय राठोड यांनी अखेर रविवारी (ता. २८) राजीनामा दिला आहे. वर्षा बंगल्यावर झालेल्या चर्चेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राठोड यांनी राजीनामा सोपविला. मागील दोन आठवड्यांपासून पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून वनमंत्री राठोड चर्चेत होते. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला  राठोड यांचा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घेतला.

वरिष्ठ मंत्र्यांच्या चर्चेनंतर राजीनामा वनमंत्री संजय राठोड रविवारी दुपारी आपला राजीनामा घेऊन वर्षा बंगल्यावर गेले. या प्रकरणाची जोपर्यंत चौकशी होत नाही, तोपर्यंत राजीनामा घेऊ नये, अशी विनंती राठोड यांनी मुख्यमंत्र्यांना केली. या वेळी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री अनिल परब उपस्थित होते. या चौघांमध्ये चर्चा झाली, चर्चेनंतर राजीनामा घेण्यात आला. राजीनाम्यानंतर बोलताना राठोड म्हणाले, ``विरोधी पक्षाने घाणेरडे राजकारण करून माझी, माझ्या समाजाची बदनामी करण्याचा प्रयत्न केला. मला राजकीय जीवनातून उठवण्याचा प्रयत्न झाला. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी आणि या प्रकरणातून सत्य बाहेर यावे.``

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bachchu Kadu : देशात धर्म नाहीतर शेतकरी संकटात, बच्चू कडूंचा विरोधकांवर 'प्रहार'

Water Scarcity : आडातच नाही, तर...

Agriculture Department : राज्याला मिळेना विस्तार संचालक

POCRA Subsidy : ‘पोकरा’चे अनुदान लाटण्यासाठी बोगस बिले सादर केल्याचा संशय

Tomato Cultivation : अकोले, संगमनेरमध्ये टोमॅटो लागवडीत घट

SCROLL FOR NEXT