शेतकरी परदेश दौऱ्यासाठीच्या अर्जाची सोमवारी सोडत
शेतकरी परदेश दौऱ्यासाठीच्या अर्जाची सोमवारी सोडत 
मुख्य बातम्या

पुण्यात परदेश दौऱ्यासाठीच्या अर्जाची सोमवारी सोडत

टीम अॅग्रोवन

पुणे  ः  जिल्ह्यातील शेतकऱ्यांना परदेशात अभ्यास दौऱ्यासाठी कृषी विभागामार्फत पाठविण्यात येणार आहे. त्यासाठी नुकतेच अर्ज मागविण्यात आले होते. या अर्जाची जेष्ठता सुची तयार करण्यासाठी सोमवारी (ता.६) दुपारी तीन वाजता विभागीय कृषी विस्तार केंद्र शिवाजीनगर येथे सोडत कार्यक्रम आयोजित केली आहे.   पुणे जिल्ह्यातील विविध पिकांची उत्पादकता, पीक पद्धतीमधील आधुनिक तंत्रज्ञान, कृषी उत्पादनाचे बाजार व्यवस्थापन, निर्यातीच्या संधी, कृषी प्रक्रियेतील अद्यावत पद्धती यामध्ये आमूलाग्र बदल आणण्यासाठी शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे ही राज्य पुरष्कृत योजना राबविण्यात येत आहे. विविध देशांनी विकसित केलेल्या शेतीविषयक तंत्रज्ञान व तेथील शेतकऱ्यांनी त्याचा केलेला अवलंब व त्याद्वारे त्याच्या उत्पादनात झालेली वाढ याबाबत त्या-त्या देशांतील शास्त्रज्ञांशी प्रत्यक्ष चर्चा, क्षेत्रीय भेटी तसेच संबधित संस्थांना भेटी याद्वारे शेतकऱ्यांचे ज्ञान व क्षमता उंचावण्यासाठी अभ्यास दौरे आयोजित केले जाते.  त्यासाठी जिल्हयातील ४९६ शेतकऱ्यांनी या अभ्यासदौऱ्यासाठी अर्ज केलेले आहेत. शासनाच्या सुचनेनुसार या अर्जातून पात्र शेतकऱ्यांची लॉटरी पद्धीतीने जेष्ठता सुची करण्याचे निर्देश दिले आहे. त्यासाठी लॉटरी पद्धतीने जेष्ठता सूची तयार करण्यात येणार आहे. तरी अर्जदार शेतकऱ्यांच्या सक्षम लॉटरी पद्धतीने सोडत असल्याने सर्व अर्जदार शेतकऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Karnataka Drought farmers : कर्नाटकातील शेतकऱ्यांना लवकरच दिलासा; दोन-तीन दिवसांत मिळणार दुष्काळाचे पैसे 

Monsoon 2024 : सलग अकरा महीने उष्णतेची| तीन नवीन ट्रॅक्टर बाजारात दाखल| राज्यात काय घडलं?

Jambhul Season : जांभळाचा हंगाम लांबल्याने जांभूळ पिकाला फटका

Crop Loan : पीक वाटपात विदर्भ आणि मराठवाड्याशी दुजाभाव का?

Land Survey : कोल्हापुरातील सहा तालुक्यांत जमिनींची ‘ई-मोजणी’ सुरू

SCROLL FOR NEXT