दुष्काळात चारा दर भडकला
दुष्काळात चारा दर भडकला 
मुख्य बातम्या

दुष्काळात चारा दर भडकला

टीम अॅग्रोवन

सांगली  ः जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्यातील जत, कवठेमहांकाळ, तासगाव, खानापूर आणि आटपाडी तालुक्यांत दिवसेंदिवस दुष्काळाची दाहकता वाढू लागली आहे. कारखाने सुरू होते, तोपर्यंत विकतच्या वाढ्यावर दिवस काढले. पण आता ते देखील परवडण्यापलीकडे गेले आहे. गेल्या महिन्यात ज्वारीचा कडबा ३ हजार रुपये शेकडा मिळायचा, हाच दर आता चार हजारावर गेला आहे. त्यामुळे दुष्काळाच्या वणव्यात कुटुंब जगवायचं का जनावर, या विवंचनेत शेतकरी आहेत.  दुष्काळी पट्ट्याच उसाचे वाढे हाच जनावरांचा चारा झाला आहे. परंतु जिल्ह्यातील तीन साखर कारखान्याचे गाळप बंद झाले आहे. त्यामुळे शेजारील सोलापूर जिल्ह्यातील अकलूज परिसरातून दिवसाला पाच ते सहा गाड्यांतून दिघंचीत वाड्याची विक्री होत आहे. तो खरेदीसाठी शेतकऱ्यांची झुंबड उडते. परंतु या चाऱ्यासाठी जादा किंमत मोजावी लागते आहे. चारा छावण्या सुरू करण्याची मागणी केली असली, तरी शासन स्तरावर ढिम्म कारभार सुरू आहे. दुष्काळामुळे शेतमजुराच्या हाताला काम नाही. शेतकऱ्यांना उत्पन्न नाही. सध्या मार्च महिना सुरू असून, अजून कडक उन्हाळ्याचे तीन महिने आहेत. ते कसे काढायचे हा मोठा प्रश्‍न शेतकऱ्यांसमोर आहे.  जिल्ह्यातील जत, कवठेमहांकाळ, आटपाडी, खानापूर आणि तासगाव या तालुक्यांसह इतर गावांमध्ये गंभीर स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. शासनाकडून तत्काळ उपाययोजना अपेक्षित होत्या. मात्र अद्यापही शासनाकडून ठोस उपाययोजना केल्या गेल्या नाहीत.  ७० हजार किलो बियाण्यांची वैरण किती?  जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडून जिल्हा नियोजन समितीच्या फंडातून ऐन दुष्काळात ७० हजार ४१० किलो इतके मका बियाण्याचे वैरणीसाठी मोफत वाटप करण्यात आले. मात्र त्यापैकी कितीचा चारा झाला? याबाबत मात्र कोणाकडे उत्तर नाही. त्यामुळे हा खर्च वाया गेला की काय, असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे.  सध्याचे वैरणीचे दर 

  •  ओली वैरण........३००० रुपये गुंठा 
  •  उसाचे वाडे (२० गरी पेंडी)........ १५ ते २० रुपये 
  •  ज्वारीचा कडबा........ ४००० रुपये शेकडा 
  •  मक्‍याचे केम्बळ........ २५०० रुपये शेकडा 
  • शासनाने शेतकऱ्याचा अंत पाहू नये. पशुधन वाचवण्यासाठी तातडीने चारा छावण्या सुरू करून शेतकऱ्यांना आधार द्यावा.  - सोमा पाटील,  दिघंजी, ता. आटपाडी

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

    Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

    Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

    Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

    Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

    SCROLL FOR NEXT