संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

नगर जिल्ह्यात चारा पिकांची ७९०६ हेक्टरवर लागवड

टीम अॅग्रोवन

नगर  ः जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने जिल्हाभरात ७९०६ हेक्टर क्षेत्रावर मका, बाजरी आदी चारा पिकांची लागवड केली आहे. त्यातून ६१८० मेट्रीक टन चारा उपलब्ध होणार असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागातून देण्यात आली.

जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने चाराटंचाई भासत आहे. यंदाच्या उन्हाळ्यात तर भीषण दुष्काळाला सामोरे जावे लागले. अजूनही पुरेसा पाऊस नसल्याने व त्यामुळे चारा उत्पादन झाले नसल्याने जनावरांना छावण्यांमध्ये दाखल करावे लागले. यंदा जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने मक्याचे ५४०, बाजरीचे १०९६ हेक्टर व न्युट्रीफिडची ६ हजार २६९ हेक्टरवर चारा पिकांची लागवड केली आहे. त्यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून पाचशे किलो बियाणे शेतकऱ्यांना दिले आहे. त्यातून ६१८० मेट्रीक टन चारा उपलब्ध होणार आहे. 

जिल्ह्यात गायवर्गीय १४ लाख ९ हजार, म्हैसवर्गीय २ लाख ३१ हजार जनावरे आहेत. त्यात ५ लाख ३३ हजार जनावरे दुभती आहेत. जिल्हाभरात सुमारे बारा लाख शेळ्या, मेंढ्या आहेत. जिल्हाभरात दर दिवसाला साधारण सात हजार ८०० मेट्रीक टन म्हणजे वर्षभरात सुमारे २८ लाख ४७ हजार मेट्रीक टन चाऱ्याची गरज भासते. मात्र चराई, गायरान, वन, पडीक जमीन, बांध, चारा उत्पादन व पिकांपासून साधारण २० ते २२ लाख चारा उपलब्ध होतो. गरजेएवढा चारा उपलब्ध होत नसल्याने उसाच्या चाऱ्यावर अनेक भागांतील जनावरांना भूक भागवावी लागते. त्यामुळे यंदा जिल्हा परिषद चारा उत्पादनावर भर देणार आहे असे सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Unseasonal Rain : पूर्व विदर्भाला वादळी वाऱ्यासह पावसाचा दणका

Weather Update : विदर्भात गारपीट, वादळी पावसाचा इशारा

Karnataka Drought farmers : कर्नाटकातील शेतकऱ्यांना लवकरच दिलासा; दोन-तीन दिवसांत मिळणार दुष्काळाचे पैसे 

Monsoon 2024 : सलग अकरा महीने उष्णतेची| तीन नवीन ट्रॅक्टर बाजारात दाखल| राज्यात काय घडलं?

Jambhul Season : जांभळाचा हंगाम लांबल्याने जांभूळ पिकाला फटका

SCROLL FOR NEXT