flowers
flowers 
मुख्य बातम्या

अकोला जिल्ह्यात फूलशेतीचे झाले मातेरे

टीम अॅग्रोवन

अकोला ः जिल्ह्यात फूलशेतीचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पातूर तालुक्यातील फुल उत्पादक ‘कोरोना’मुळे पहिल्यांदा मोठ्या अडचणीत आले आहेत. या तालुक्यात सुमारे पाचशे एकरांवर फुलशेती केली जात असून बाजारपेठ व मागणी अभावी या फुलांचे करायचे काय, असा प्रश्न उत्पादक शेतकऱ्यांना भेडसावत आहे.

‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. ही बंदी शेतकऱ्यांच्या मुळावर उठली आहे. दरवर्षी मार्च महिन्यात लग्नसराई तसेच विविध यात्रोत्सव होत असतात. याकाळात फुलांना चांगली मागणी असते. त्यामुळे शेतकरी पारंपरिक पिकांसोबत फूलशेती करतात. प्रामुख्याने पातूर तालुक्यात फूलशेतीचे क्षेत्र पाचशे एकरांपेक्षा अधिक आहे. 

बाळापूर, मूर्तिजापूर, बार्शीटाकळी आदी तालुक्यातही  फुलशेतीचे क्षेत्र आहे. ही सर्व फुले अकोला, शेगाव व इतर शहरांमध्ये विक्रीसाठी पाठवली जातात. ‘कोरोना’ आल्यापासून संपर्ण बाजारपेठ बंद आहे. प्रामुख्याने फूलशेतीची उलाढालच ठप्प झालेली आहे. एकही खरेदीदार सध्या माल घ्यायला तयार नाही. त्यामुळे शेतात उभे असलेल्या पिकातील फुले कुठे न्यायची असा प्रश्न तयार झालेला आहे. फूलविक्री बंद झाल्याने त्यावर आधारीत उद्योगही थांबलेला आहे. फूलशेतीत राबणारे मजूरही कामावरून बंद करावे लागले आहेत.

लॉकडाऊनमुळे फुलांना कोणी घेणारा नाही. आमच्या तालुक्यातील सुमारे पाचशे सहाशे एकरांवरील फुले झाडांवरच खराब होत आहेत. मला पॉलिहाऊसमधील गुलाबही फेकून द्यावा लागत आहे. फूलशेती जीवनावश्यक नसली तरी शेतकऱ्यांचे एक पीक असल्याने त्याबाबत शासनाने सहानुभूतीने विचार करणे गरजेचे आहे. तरच हा शेतकरी टिकू शकेल. - उमेश फुलारी, फुलउत्पादक, पातूर, जि. अकोला   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bachchu Kadu : देशात धर्म नाहीतर शेतकरी संकटात, बच्चू कडूंचा विरोधकांवर 'प्रहार'

Water Scarcity : आडातच नाही, तर...

Agriculture Department : राज्याला मिळेना विस्तार संचालक

POCRA Subsidy : ‘पोकरा’चे अनुदान लाटण्यासाठी बोगस बिले सादर केल्याचा संशय

Tomato Cultivation : अकोले, संगमनेरमध्ये टोमॅटो लागवडीत घट

SCROLL FOR NEXT