पुष्पोत्सव अधिक मोठ्या स्वरूपात साजरा करावा : अभिनेत्री तुळजापूरकर
पुष्पोत्सव अधिक मोठ्या स्वरूपात साजरा करावा : अभिनेत्री तुळजापूरकर  
मुख्य बातम्या

पुष्पोत्सव अधिक मोठ्या स्वरूपात साजरा करावा : अभिनेत्री तुळजापूरकर

टीम अॅग्रोवन

नाशिक : ‘नाशिक महापालिका राबवत असलेला पुष्पोत्सवाचा उपक्रम देखणा व रेखीव आहे. त्या माध्यमातून पुष्पप्रेमींना मोठी पर्वणी असते, पुढील वर्षीपासून अधिक मोठ्या स्वरूपात साजरा करावा’, अशी अपेक्षा अभिनेत्री प्रिया तुळजापूरकर यांनी व्यक्‍त केली.  नाशिक महापालिकेच्या वतीने आयोजित पुष्पोत्सवाच्या समारोप कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या वेळी महापौर सतीश कुलकर्णी, महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे, उपायुक्त (उद्यान) शिवाजी आमले यांच्यासह अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. गुरुवारी (ता.२०) उद्‌घाटन झाल्यावर गत चार दिवसांत लाखभर नाशिककरांनी पुष्पोत्सवास भेट देऊन फुलांचे प्रकार, पुष्परचना अनुभवल्या. महोत्सवात शेवटच्या दिवसापर्यंत चाळीस लाख रुपयांच्या विविध रोपांची विक्री झाली. गत चार दिवसांत पुष्पोत्सवास नाशिककरांनी सहकुटुंब भेट दिल्याचे उपायुक्त शिवाजी आमले यांनी सांगितले.  वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर पुढील वर्षीपासून हे प्रदर्शन जानेवारीतच भरविण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला. तत्पूर्वी समारोपाच्या सत्रात बोलताना महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी हे पुष्पप्रदर्शन पुढील वर्षीपासून गोल्फ क्‍लब मैदानावर भरविण्याची कल्पना मांडली.  सोनू काठे यांच्या फुलाने गुलाबपुष्प गटात सादर केलेल्या पिवळ्या व केशरी फुलाला प्रथम व द्वितीय क्रमांक मिळाला. याशिवाय सेल्फी पॉइंट उभारण्यात योगदान देणाऱ्या समीर मांजरेकर व गोकूळ पाटील यांचाही गौरव करण्यात आला. व्यक्तिचित्र रांगोळीतील योगदानाबाबत सुनील देवपूरकर; तर वार्ली पेंटिंग्जसाठी प्रेमदा दांडेकर यांना प्रथम क्रमाकांने गौरविण्यात आले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Update : कोकणात उन्हाचा चटका ठरणार तापदायक

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

SCROLL FOR NEXT