Flower farm damage due to lockdown
Flower farm damage due to lockdown 
मुख्य बातम्या

नेरच्या शेतकऱ्यांची सोन्यासारखी फुले मातीमोल

टीम अॅग्रोवन

देऊर, जि. धुळे : जगासह देशात ‘कोरोना’ विषाणूने धुमाकूळ घातलेला आहे. या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊन केल्यामुळे शेतकऱ्यांचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे. शेतमालाला बाजारपेठेत मागणी नसल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक कुऱ्हाड कोसळली आहे. सोळा दिवसांपासून देशात लॉकडाऊन आहे. बाजारपेठा ठप्प झाल्या आहेत. याचा फटका फुलशेतीलाही बसला आहे. 

धुळे तालुक्यातील नेर येथील फुलशेती बागायतदार शेतकरी तुकाराम माळी यांनी आपल्या शेतामध्ये तेरा एकरवर झेंडू, गुलाब, मोगरा, लिली, निशिगंधा, गॅलेंडर, लिली आदि फुलाची बाग फुलवली होती. मात्र, हीच फुलं आता खुडून त्यांना फेकून द्यावी लागली आहेत. उर्वरित गॅलेंडर शेतीवर नाइलाजाने रोटाव्हेटर मारावे  लागले आहे.

आत्तापर्यंत सत्तर हजारांवर नुकसान झाले आहे. झेंडूच्या फुलांच्या शेतीसाठी माळी कुटुंबाने रोप लागवड, मशागत, फवारणीचे औषधे, खते, तोडणीसाठी मजुरी असा अडीच लाख रुपयांचा खर्च केला आहे. यासाठी आपल्या संपूर्ण कुटुंबासह ही संपूर्ण बाग फुलवली आहे. फुलाच्या विक्रीमधून चांगले उत्पन्न पदरात पडेल, अशी अपेक्षा त्यांना होती. पाडवा व लग्नसराईचे दिवस पाहून झेंडू, गॅलेंडर, गुलाब, मोगरा, निशिगंधा, लिली बाग देखील फुलांनी सजवली होती. झेंडूना मोठी फुलेही लागली. 

‘कोरोना’च्या प्रादुर्भावामुळे सध्या तरी मार्केट बंद असल्याने झाडांना इजा होऊ नये म्हणून उमललेली फुले तोडून रस्त्यावर टाकायची वेळ येत आहे. झाडावरून फूल तोडली नाहीत तर फुलझाडाची शक्ती कमी होते. बहार कमजोर होतो. पुढे अपेक्षा आहे. बाजारपेठ सुरू होणार. त्यामुळे फुलशेती टिकवावी लागत आहे.  सर्व काही बंद असल्याकारणाने फुलांची व्यवस्था कशी करावी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

‘कोरोना’च्या प्रादुर्भावामुळे ऐन सणासह लग्न हंगामही धोक्‍यात आल्याने व बाजारपेठा बंद आहे. त्यामुळे झेंडूच्या मालाला उठावच नाही. फूल उत्पादक शेतकऱ्यांचा हंगाम वाया गेला आहे. माझ्यासारखे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. फुलाची झाडे टिकविण्यासाठी व पुढील कळ्या उमलण्यासाठी उमललेली फुले तोडून टाकण्याशिवाय आम्हाला पर्याय उरला नाही. प्रशासनाने विचार करून मदत करावी. — तुकाराम माळी, फुलशेती बागायतदार, नेर, ता. धुळे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

SCROLL FOR NEXT