विजयादशमीनिमित्त फुलांना मागणी वाढली
विजयादशमीनिमित्त फुलांना मागणी वाढली 
मुख्य बातम्या

विजयादशमीनिमित्त फुलांना मागणी वाढली

टीम अॅग्रोवन

पुणे ः गुरुवारी (ता. १८) साजऱ्या हाेणाऱ्या विजयादशमी (दसरा) निमित्त पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील फूलबाजारात झेंडू आणि शेवंतीच्या फुलांना मागणी वाढली हाेती. या वेळी झेंडूला ३० ते ७० तर शेवंतीला ३० ते ८० रुपये प्रतिकिलाेला दर हाेता. अशी माहिती आडते सागर भाेसले यांनी दिली. तर शेतकऱ्यांना आज (ता. १७) ५० रुपये दर मिळेल, अशी अाशा शेतकरी लक्ष्‍मण वाघमाेडे (रा. हिंगाेली) यांनी व्यक्त केली आहे.  नवरात्रीनिमित्त झेंडू, शेवंती, गुलछडी या फुलांना मागणी वाढली हाेती. यामुळे या फुलांच्या दरात वाढ झाली हाेती. नवरात्रीच्या मध्यतंरी शेवंतीची माेठ्याप्रमाणावर आवक हाेऊन दर २० रुपयांपर्यंत खाली आले हाेते. मात्र यानंतर फुलांचे दर वाढले असून, आज (ता. १७) मागणी वाढणार असून, आवकदेखील वाढणार आहे.  दसऱ्यासाठीच्या फुलांची साेमवार (ता. १५) रात्रीपासूनच आवक वाढण्यास सुरू झाली हाेती. पहाटे झेंडूला ३० ते ४० रुपये दर हाेते. मात्र नंतर आवक कमी झाल्यानंतर झेंडूच्या दरात वाढ हाेऊन ७० रुपयांपर्यंत तर शेवंतीचे दर ८० रुपयांपर्यंत वाढले हाेेते, असे भाेसले यांनी सांगितले.  या वेळी बाेलताना शेतकरी लक्ष्मण यादवराव वाघमाेडे (रा. शेणगाव, जि. हिंगाेली) म्हणाले, की मी ६ एकर झेंडू लावला असून, आज ४०० क्रेट फुले विक्रीसाठी आणली हाेती. आज ३५ ते ४० रुपयांपर्यंत दर मिळाला असून, उद्या परत ४०० क्रेट विक्रीसाठी आणणार आहे. उद्या मागणी वाढण्याची शक्यता असून ५० रुपयांपर्यंत दर मिळेल अशी आशा आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Brazil Flood : ब्राझीलमध्ये पुरामुळे ५६ लोकांचा मृत्यू

Shirur Lok Sabha : शेती, बेरोजगारी, वाहतूकप्रश्‍न ‘जैसे थे’

Sugarcane FRP : ‘सोमेश्वर’चा शंभर रुपयांचा दुसरा हप्ता आज देणार

Sugar Industry : साखर उद्योग प्राप्तिकरातून मुक्त केला ः पाटील

Onion Rate : कांद्याचे बाजार शुल्क घटवले एक रुपयावरून ५० पैशांवर

SCROLL FOR NEXT