पूरग्रस्त भागात जनावरांना न्यूमोनिया, घटसर्पचा विळखा
पूरग्रस्त भागात जनावरांना न्यूमोनिया, घटसर्पचा विळखा 
मुख्य बातम्या

पूरग्रस्त भागात जनावरांना न्यूमोनिया, घटसर्पचा विळखा

टीम अॅग्रोवन

पुणे : सततचा पाऊस आणि पुराच्या पाण्यात भिजल्याने जनावरांमध्ये न्यूमोनिया आणि घटसर्प आजारांची लक्षणे मोठ्या प्रमाणात दिसू लागली आहेत. आजारी जनावरांच्या औषधोपचारासाठी ९ जिल्ह्यांतील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची चक्राकार पद्धतीने नियुक्ती करण्यात आली. आजारी जनावरे आणि आजारी पडू नयेत यासाठी सुमारे दीड लाख जनावरांना लसीकरण करण्यात आल्याचा दावा पशुसंवर्धन आयुक्तालयाकडून करण्यात आला आहे.  गेल्या पंधरवड्यात सांगली, कोल्हापूरसह कोकण आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी आणि पुराचे थैमान होते. याचा जनावरांच्या आरोग्यावर परिणाम झाला. सततच्या पावसामुळे गाई, म्हशी, शेळी, मेंढी आणि कोंबड्या भिजल्याने न्यूमोनिया आणि घटसर्पाची लक्षणे मोठ्या प्रमाणात दिसू लागल्याने अनेक जनावरे आजारी पडली असून, त्यांच्या उपचारासाठी पशुसंवर्धन विभागाने मोहीम हाती घेतली आहे.  यासाठी ९ विविध जिल्ह्यांतील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची चक्राकार पद्धतीने नियुक्ती केली आहे. घटसर्पाच्या लसीकरणासाठी ७ लाख मात्रा तयार असून, गरज आणि मागणीनुसार पुरवठा सुरू आहे. सध्या सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यासाठी ६० हजार मात्रा पाठविल्या असून, रविवारअखेरपर्यंत सुमारे दीड लाख जनावरांना लसीकरण आणि औषधोपचार करण्यात आल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त डॉ. धनंजय परकाळे यांनी दिली.     दरम्यान, सुमारे आठ हजार गाई, म्हशी वाहून गेल्याची नोंद झाली आहे. मृत १ हजार ६९४ जनावरांची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावली आहे. अजूनही सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील काही गावे पाण्याखाली असून, पाणी ओसरल्यानंतर मृत जनावरांची आकडेवारी समोर येईल. तलाठ्यांकडून होणाऱ्या पंचनाम्यानंतर आणि पशुगणनेनुसार मृत जनावरांची आकडेवारी समोर येईल, असे डॉ. परकाळे यांनी स्पष्ट केले. आज (मंगळवार, ता. २०) मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पूरग्रस्त जिल्ह्यांतील जनावरांसाठी विशेष योजनेला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soil Conservation : ‘भूमी सुपोषण-संरक्षण’चा दीडशे गावांत संकल्प

Hapus Mango : सिंधुदुर्गातील बापर्डे येथे ६०५ ग्रॅमचा हापूस आंबा

Mango Season : आंबा विक्रीतून एक कोटी ६३ लाखांची कमाई

Climate Change : बदलत्या हवामानामुळे ‘ग्रीन नेट’ला मरगळ

Tambul GI : तांबूलसाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT