Fixed charge of electricity bill postponed for three months
Fixed charge of electricity bill postponed for three months 
मुख्य बातम्या

वीजबिलातील स्थिर आकार तीन महिन्यांसाठी स्थगित ः ऊर्जामंत्री राऊत

टीम अॅग्रोवन

नाशिक : ‘कोरोना’च्या प्रादुर्भावामुळे राज्यात ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील बहुतेक सर्वच मोठे उद्योग आणि वाणिज्यिक ग्राहकांनी आपला व्यवसाय बंद केला आहे. बंद असलेल्या औद्योगिक आणि वाणिज्यिक ग्राहकांच्या वीजबिलातील स्थिर आकार, मागणी आकार पुढील ३ महिन्यांसाठी स्थगित करण्यात येत आहे. त्यानंतर येणाऱ्या बिलात कोणताही दंड न आकारता तो समाविष्ट करण्यात येईल,’’ अशी माहिती ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली. 

‘लॉकडाऊन’च्या कालावधीतील वीजबिलातील स्थिर आकार, मागणी आकार माफ करावा, अशी मागणी औद्योगिक, वाणिज्यिक ग्राहकांनी केली होती. ही मागणी ग्राह्य धरून ऊर्जामंत्र्यांनी  दिलासा दिला आहे. ‘एएमआर’मार्फत ज्या ग्राहकांचे मीटर वाचन उपलब्ध आहे, अशा ग्राहकांना त्यांच्या मीटरवरील नोंदीनुसार वास्तविक बील देण्यात येईल. जर ग्राहकांचे मीटर रीडिंग उपलब्ध नसेल, तर त्या ग्राहकांना सरासरी वीजबिल आकारण्यात येईल. मे-२०२० मध्ये ‘एएमआर’मार्फत बिलाची माहिती उपलब्ध झाल्यानंतर वास्तविक मीटर रीडिंगनुसार वीजबिल आकारण्यात येईल, असे डॉ. राऊत यांनी सांगितले. 

डॉ. राऊत म्हणाले, ‘‘लॉकडाऊनच्या कालावधीत कुठल्याही प्रकारचा वीजवापर झाला नसल्याचे समजून या दरम्याचे शून्य वापराचे वीजबिल देण्यात येईल. अशा ग्राहकांचे मीटर रीडिंग मिळाल्यानंतर त्यांना लॉकडाऊनच्या कालावधीत नोंदविलेल्या वास्तविक वापराचे वीजबिल देण्यात येईल.

महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार मीटर वाचन होणार नाही. बिलिंग सरासरी मासिक वापरावर राहील. ग्राहकांना वेबसाईट किंवा मोबाईल अॅपद्वारे सेल्फ रीडिंग (स्वत: घेतलेले) घेऊन वीजबिल भरता येईल. ज्या ग्राहकांनी स्वत:हून मीटर रीडिंग सादर केले, त्यांना सरासरीनुसार वीज आकारणी केली जाईल. पुढील काळात ज्यावेळी मीटर रीडिंग घेतले जाईल, त्यावेळी ग्राहकांना त्या महिन्यांचे सरासरी बिल आकारले जाईल, असेही डॉ. राऊत यांनी सांगितले.

वीज बिल भरण्यास सवलत  तात्काळ वीजबिल भरणा, गो-ग्रीन सवलत, डीजिटल पेमेंटबाबतच्या सवलती ग्राहकांना नियमाप्रमाणे लागू आहेत. मार्च महिन्याचे बिल भरण्यास १५ मेपर्यंत सवलत देण्यात आली आहे. तर, एप्रिल-२०२० चे वीजबिल भरण्यासाठी ३१ मे अंतिम तारीख दिली आहे. ग्राहकांनी आपले वीजबिल वेळेवर भरून महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहनही डॉ. राऊत यांनी केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

SCROLL FOR NEXT