cane crushing
cane crushing 
मुख्य बातम्या

पुणे विभागात पाच कारखान्यांची धुराडी बंद

टीम अॅग्रोवन

पुणे ः उन्हाचा चटका वाढल्याने साखर कारखान्यांनी आपला गळीत हंगाम आटोपण्यास सुरुवात केली आहे. पुणे विभागातील पाच साखर कारखान्यांनी हंगाम आटोपला असून, कारखानास्थळी शुकशुकाट पाहावयास मिळत आहे. त्यामुळे तोडणी मजूर परतीच्या प्रवासाला निघाले आहेत. येत्या महिनाभरात उर्वरित साखर कारखाने बंद होतील, अशी माहिती पुणे प्रादेशिक सहसंचालक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली.   एक नोव्हेंबरपासून गळीत हंगामास सुरुवात झाली होती. पुणे विभागात हंगामात ३४ साखर कारखान्यांपैकी ३० साखर कारखान्यांनी गाळप हंगाम सुरू केला होता. त्यामुळे कारखाना कार्यस्थळावर किराणा दुकाने, हॉटेल यांचाही व्यवसाय सुरू होता. पुणे जिल्ह्यातील शिरूरमधील घोडगंगा सहकारी साखर कारखान्याने १४ फेब्रुवारी, तर व्यंकटेशकृपा व अनुराज शुगर्स या खासगी साखर कारखान्याने २० फेब्रुवारीला गळीत हंगाम बंद केला. तर २१ फेब्रुवारी रोजी श्रीनाथ म्हस्कोबा या साखर कारखान्याने गळीत हंगाम बंद केला. त्यानंतर हळूहळू कारखान्यांनी गळीत हंगाम आटोपता घेण्यास सुरुवात केली. जिल्ह्यात एप्रिल अखेरपर्यंत गळीत हंगाम आटोपला जाण्याची शक्यता आहे. सध्या कारखाने बंद झाल्यामुळे कारखाना कार्यस्थळावरील हॉटेल, दुकानातील ग्राहकांच्या संख्येत घट झाली आहे. यंदा उसाच्या गाळप हंगामासाठी विभागात एकूण सहकारी १९ व खासगी ११ साखर कारखाने सुरू झाले होते. या साखर कारखान्यांची दैनंदिन गाळपक्षमता एक लाख ४२ हजार टन एवढी होती. उसाची वाढत असलेली टंचाई लक्षात घेता लवकरच साखर कारखाने बंद होण्याचा अंदाज होता. परंतु उसाची उपलब्धता बऱ्यापैकी असल्याने गळीत हंगाम उशिराने म्हणजेच फेब्रुवारीपासून बंद होण्यास सुरुवात झाली आहे. पुणे जिल्ह्यातील अनेक भागांत पाणीटंचाईची झळ वाढू लागली आहे. त्यामुळे साखर कारखान्यांनी १४ फेब्रुवारीपासून गळीत हंगाम लवकर संपवण्याचा धडाका सुरू केला. आतापर्यंत बंद झालेल्या साखर कारखान्यांमध्ये पुण्यातील पाच साखर कारखान्यांचा समावेश असून, साताऱ्यामधील साखर कारखाने सुरू आहेत, असे पुणे प्रादेशिक सहसंचालक कार्यालयाच्या सूत्रांनी सांगितले. बंद झालेले साखर कारखाने

  • घोडगंगा सहकारी साखर कारखाना
  • श्रीनाथ म्हस्कोबा (खासगी)
  • अनुराज शुगर्स (खासगी)
  • पराग शुगर (खासगी)
  • व्यंकटेशकृपा शुगर (खासगी)
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Onion Market : कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पुन्हा धुळफेक; सरकारने दिलेली ९९,१५० टन निर्यातीला परवानगी जुनीच

    Fertilizer Demand : चोपडा तालुक्याला २७ हजार टन खतांची गरज

    Agrowon Podcast : कापूस भाव स्थिरावले ; कापूस, सोयाबीन, तूर, तसेच आल्याचा काय आहे दर ?

    Animal Treatment : दररोज ३०-४० जनावरांवर उपचार बंधनकारक

    Kharif Season : खरिपात वाढणार सोयाबीन, कपाशी क्षेत्र

    SCROLL FOR NEXT