मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांत हलक्या, मध्यम सरी
मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांत हलक्या, मध्यम सरी  
मुख्य बातम्या

मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांत हलक्या, मध्यम सरी

टीम अॅग्रोवन

उस्मानाबाद/ लातूर : औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यांतील १३९ मंडळांत सोमवारी (ता. ५) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत पावसाने हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली. उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर, उमरगा तालुक्‍यात मात्र दमदार पाऊस झाला.  

औरंगाबाद जिल्ह्यातील ६५ पैकी ५५ मंडळांत रिमझिम पाऊस झाला. अधूनमधून थोड्या जास्त प्रमाणात बरसणाऱ्या श्रावण सरीचा जोर औरंगाबाद, वैजापूर, कन्नड तालुक्‍ंयात थोडा जास्त राहिला. वैजापूर मंडळात २० मिलिमिटर, नागमठाण २१, लोणी २२, लाडगाव १२, शिवूर १५, चिकलठाणा २१, करंजखेडा १३, देवगाव रंगारी १२, चापानेर १२, नाचनवेल १२, कन्नड १४, बाजारसावंगी १४, अंबाई १८,  बीडकीन १२, फूलंब्री १८, उस्मानपूरा १८, औरंगाबाद १२, तर कांचनवाडीत १२ मिलिमिटर पावसाची नोंद झाली. 

जालना जिल्ह्यातील ४९ मंडळांपैकी भोकरदन, जाफ्राबाद, अंबड तालुक्‍यातील एक मंडळ मिळून १६ मंडळांत १ ते १८ मिलिमिटर दरम्यान पावसाची नोंद झाली. बीड जिल्ह्यातील ६३ मंडळांपैकी आष्टी, पाटोदा, शिरूर कासार, बीड या तालुक्यांतील १४ मंडळांत तुरळक ते हलका पाऊस झाला. १ ते १२ मिलिमीटर दरम्यान पावसाची नोंद या तालुक्‍यांमध्ये झाली. लातूर जिल्ह्यातील ५३ मंडळांपैकी २४ मंडळांत पाऊस झाला. औसा तालुक्‍यातील किल्लारी मंडळात सर्वाधिक ४४ मिलिमिटर पावसाची नोंद झाली. निलंगा तालुक्‍यातील निलंगा मंडळात २७, अंबुलगा बु.२०, कासारशीरसी २५, मदनसुरी १७, औराद श. २८, कासारबालकुंदा येथे २२ मिलिमिटर पाऊस झाला. इतर मंडळात तुरळक ते हलका पाऊस झाला. 

उस्मानाबाद जिल्ह्यातील ४२ मंडळांपैकी ३० मंडळांत पावसाचा जोर अधिक राहिला. तुळजापूर, उमरगा तालुक्‍यांतील मंडळांत अधिक पाऊस झाला. तुळजापूर तालुक्‍यातील तुळजापूर मंडळात १३ मिलिमिटर, सावगाव १७, जळकोट २५, नळदूर्ग ३३, मंगरूळ १९, सालगरा ३२, उमरगा तालुक्‍यातील उमरगा मंडळात सर्वाधिक ६० मिलिमिटर पाऊस झाला. त्यापाठोपाठ मुरूम ४५, मुळज ३५, डाळिंब ३६ लोहारा तालुक्‍यातील लोहारा १०, जेवळी येथे १५ मिलिमिटर पावसाची नोंद झाली. 

ढगांची नुसतीच गर्दी

ढगांच्या प्रमाणात पाऊस पडत नसलेल्या मराठवाड्याच्या औरंगाबादस्थित विभागीय आयुक्‍त कार्यालयाच्या इमारतीवर आता कृत्रिम पावसाच्या प्रयोगासाठी आवश्‍यक रडार रविवारी (ता. ४) बसविण्यात आले. त्यामुळे आता कृत्रिम पावसाचा प्रयोग कधी सुरू होणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Policy : धोरण विसंगतीने होतेय शेतकऱ्यांची माती

Sugarcane Industries Problems : साखर उद्योगातील समस्येवर मुख्यमंत्री चर्चा करणार, शिष्टमंडळाला आश्वासन

Bogus Seed : सीमाभागात बोगस बियाणे विक्री रोखण्यासाठी तपासणी

Soil Conservation : ‘भूमी सुपोषण-संरक्षण’चा दीडशे गावांत संकल्प

Hapus Mango : सिंधुदुर्गातील बापर्डे येथे ६०५ ग्रॅमचा हापूस आंबा

SCROLL FOR NEXT