Five crore for irrigation survey in Indapur : Bharne
Five crore for irrigation survey in Indapur : Bharne 
मुख्य बातम्या

इंदापुरातील सिंचन सर्वेक्षणासाठी पाच कोटी : भरणे

टीम अॅग्रोवन

पुणे : ‘‘इंदापूर तालुक्यातील प्रलंबित शेती प्रश्नांचे सर्वेक्षण करून सिंचन प्रश्न मार्गी लागावा, यासाठी शासनाद्वारे तब्बल पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे,’’ अशी माहिती सार्वजनिक बांधकाम, पशुसंवर्धन व सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

भरणे म्हणाले, ‘‘उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून खासदार सुप्रिया सुळे यांच्या सहकार्याने इंदापूर तालुक्यातील कुंभारगाव, शेटफळ, हवेली तलाव, डाळज कालठण नंबर एक, दोन शिरसवडी या उजनी जलाशयातील बुडित बंधारे तसेच विविध सिंचन योजना, खोरोची बॅरेज लाकडी निंबोडी उपसा सिंचन योजना आदी कामे मार्गी लागावी, यासाठी जलसंपदामंत्री व संबंधित शेतकरी शिष्टमंडळासमवेत मुंबई येथे महत्त्वाच्या दोन बैठका घेतल्या.

जलसंपदा विभागाने या कामासाठी निधी देण्यासाठी भूमिका घेतल्यानंतर याच कामाचे सर्वेक्षण करण्यासाठी पाच कोटींचा निधी अजित पवार यांनी दिला.’’ भरणे म्हणाले, ‘‘कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे इतरत्र निधी राज्य सरकार देत नाही. मात्र, इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना शेती सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामुळे या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेऊन सर्वेक्षणासाठी पाच कोटीचा निधी मिळाला. आता कामाचे सर्वेक्षण तात्काळ केले जाणार आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून रखडलेली शेती सिंचनाची कामे मार्गी लागणार आहेत. उजनी जलाशय पट्ट्यामध्ये बुडीत बंधाऱ्यांची निर्मिती करण्यात येणार आहे. त्यामुळे हजारो शेतकऱ्यांना याबाबत बंधाऱ्यांचा फायदा होऊन शेती सुजलाम सुफलाम होण्यासाठी फायदा होणार आहे.’’

‘‘खास बाब म्हणून वळण योजनादेखील कार्यान्वित करण्यात येईल. खरोसा येथील बॅरेज लाकडी लिंबोडी उपसा सिंचन योजना या शेतकऱ्यांना वरदान असणार आहे. शेटफळ, हवेली तलावाची रखडलेली कामे सर्वेक्षण झाल्यानंतर तात्काळ सुरू केली जातील. त्यामध्ये कोकी जलसंपदा विभाग निधी देताना कमतरता करणार नाही.’’ 

निवडणुकीतील शब्द पाळला

इंदापूर तालुक्याचा पाणीप्रश्‍न अनेकांनी शब्द देऊनही सोडविला नव्हता. प्रत्येक निवडणुकीच्या वेळी पाणी प्रश्न सोडवण्याचा शब्द अनेक नेत्यांनी दिला. मात्र, तो त्यांनी कधीच पाहिला नाही. दरम्यान, विधानसभा निवडणुकीत तालुक्याचा कायमचा पाणी प्रश्न सोडविणार असल्याची ग्वाही दिली होती. त्यासाठी हा निधी मंजूर झाला,’’ असेही भरणे यांनी सांगितले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

SCROLL FOR NEXT